Corona Virus : ‘कोरोना’मुळं जगभरातील 3000 लोकांचा ‘मृत्यू’, 88000 जणांना ‘लागण’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनमधून सर्व जगात पसरलेला कोरोना व्हायरस अजूनच वाढत चालला आहे. चीनमध्ये ८८ हजार लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे, तर तब्बल ३००० हजार लोकांचा मृत्यू देखील झाला आहे. जागतिक आरोग्य संगटनेने या संसर्गजन्य रोगास सीओवीआईडी-१९ असे नाव दिलेले आहे. सगळ्यांत जास्त मृत्यू हे चीनमध्ये व त्यानंतर इराणमध्ये झाले आहेत.

चीनमध्ये २८७० मृत्यू ,७९ हजार लोकांना संसर्ग..

चीनमध्ये आतापर्यंत कोरोना व्हायरस मुळे २८७० जणांचा मृत्यू झाला असून, ७९००० हजार लोकांना संसर्ग झालेला आहे. हॉंगकॉंग मध्ये ९४ जणांना लागण झाली असून, २ जणांचा बळी गेला आहे. दक्षिण कोरियात ३७३६ बाधा झाली आहे आणि २० जण मृत्युमुखी पडले आहेत. जपानमध्ये क्रूझ जहाजावरील मिळून ९६१ जणांना संसर्ग झाला असून, १२ जणांचा मृत्यू झाला आहे. इटली देशात १५७६ जण बाधित असून, ३४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर इराणमध्ये ९७८ पैकी ५४ मृत्यू झाले आहेत. सिंगापूर मध्ये १०६ जणांना संसर्ग झालेला आहे.

अमेरिकेत ७२ बाधित नागरिकांपैकी १ जणांचा मृत्यू झाला आहे. कुवेत मध्ये ४५ जणांना संसर्ग झलेला आहे. थायलंड मध्ये १ चा मृत्यू झाला असून, ४२ जणांना संसर्ग झाला आहे. बहरीन मध्ये ३८ नागरिकांना लागण झाली आहे. तैवान मध्ये ४० मधील एका नागरिकाचा कोरोना व्हायरस मुळे मृत्यू झाला आहे. ऑस्ट्रेलिया मध्ये २३ पैकी एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. मलेशियात-२९ , जर्मनी-६६, स्पेन-७१, व्हिएतनाम-१६ आणि ब्रिटन-२३, संयुक्त अरब अमिरात-२१, कॅनडा-२०, रुस-५ या देशांतील नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच फ्रान्समध्ये १०० पैकी २ जणांचा मृत्यू झाला आहे.

स्वित्झर्लंड मध्ये -१०, ओमान-६, भारत -३, क्रोएशिया -७, युनान-७, इस्त्राईल-५, पाकिस्तान-४, फिनलंड-५, ऑस्ट्रिया-५, स्वीडन-१२, मिस्र-१, अल्जीरिया-१, अफगाणिस्तान-१, नॉर्थ मैकेडोनिया-१, जॉर्जिया -२, एस्टोनिया-१, बेल्जियम -२, नेदरलैंड -१, रोमानिया-३, नेपाल-१, श्रीलंका-१, कंबोडिया-१, नॉर्वे -२, डेन्मार्क-२, ब्राजील-१, नाइजीरिया-१, अजरबैजान-१, मोनाको-१, कतार-१, बेलारूस-१ नागरिकांना कोरोना व्हायरसची लागण झालेली आहे.

अमेरिका- वॉशिंग्टन मध्ये एकाचा मृत्यू , न्यूयॉर्क मध्ये पोहोचला कोरोना व्हायरस..

वाशिंग्टन मध्ये कोरोनामुळे एका महिलेचा बळी गेला आहे, त्याबरोबरच न्यूयॉर्क शहरांत कोरोना बाधित रुग्ण आढळून आला आहे. अमेरिकन नागरिकांना कोरोना पासून वाचवण्यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विदेशी नागरिकांना बंदी घातली आहे, ज्यांनी मागील २ आठवड्यांत इराणची यात्रा केली आहे.

चीननंतर इराणमध्ये सर्वाधिक मृत्यू 
पश्चिम आशियातील इराणमध्ये कोरोनाचे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. आतापर्यंत इराणमध्ये ९७८ लोकांना संसर्ग झाला असून, ५४ जणांचा मृत्यू झाला आहे. इराणमध्ये भारतीय नागरिक अडकले असून, भारत सरकार त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करत आहे. तेथील प्रशासनाशी चर्चा सुरु आहे.

अफगाणिस्तान जवळील सीमा बंद करणार पाकिस्तान
पाकिस्तानमध्ये कोरोना चा संसर्ग होऊ नये म्हणून, पाक सरकार अफगाणिस्तान जवळील आंतरराष्ट्रीय सीमा सात दिवस बंद ठेवणार आहे. ही घोषणा सरकारने कोरोनामूळे अजून २ जणांना लागण झाल्यानंतर एका दिवसाने केली आहे.

आखाती देशांतील स्टॉक मार्केट कोसळले ..
कोरोना व्हायरसमुळे आखाती देशांतील सस्टॉक मार्केट वर परिणाम झाले आहेत. यामुळे आखाती देशांच्या अर्थव्यवस्थेलाही धोका निर्माण झाला आहे. गेल्या १८ महिन्यांतील सार्वधिक नीचांक हा स्टोक मार्केट मध्ये आला होता.

डायमंड प्रिन्स जहाजावरुन बाहेर पडले क्रू मेंबर्स..
कोरोना विषाणूमुळे जपानमधील क्रूझ डायमंड प्रिन्सेसचे क्रू मेंबर्स आता जहाजातून बाहेर आले आहेत. जपानच्या आरोग्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. जहाजावरील शेवटचा प्रवासी उतरल्यानंतरच सर्व क्रू मेंबर्स बाहेर आले आहेत.

शूटिंग वर्ल्ड कप स्पर्धेवर परिणाम..

कोरोना विषाणूच्या संसर्गाबाबत वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय शूटिंग स्पोर्ट्स फेडरेशनने (आयएसएसएफ) रविवारी म्हटले आहे की, टोकियो ऑलिम्पिक चाचणीत सहभागी देशांचे खेळाडू निर्णय घेण्यास मोकळे आहेत. कोरोना विषाणूच्या धोक्यामुळे भारताने शुक्रवारी सायप्रसमधील नेमबाजी विश्वचषकातून माघार घेण्याचा निर्णय घेतला.