Coronavirus : कोरोनात वेळेपूर्वीच ‘या’ औषधाचा वापर ठरू शकतो जीवघेणा, AIIMS च्या संचालकांनी केलं सावध

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेने संपूर्ण देशात दहशतीचे वातावरण आहे. हॉस्पिटलमध्ये आयसीयू बेड, ऑक्सीजन आणि औषधांची कमतरता असल्याने लोकांचा मृत्यू होत आहे. अशावेळी डॉक्टर्स लोकांना सेल्फ आयसोलेशनमध्ये आपला उपचार करण्याचा सल्ला देत आहेत. परंतु काही लोक लवकर बरे होण्याच्या नादात औषधे किंवा स्टेरॉईडचा ओव्हरडोस घेत आहेत. परंतु, असे करणे रूग्णासाठी जीवघेणे ठरू शकते.

नवी दिल्ली येथील एम्सचे डायरेक्टर डॉ. रणदीप गुलेरिया यांचे म्हणणे आहे की, सिस्टीमॅटिक स्टेरॉईडच्या ओव्हरडोसने रूग्णाचे नुकसान होऊ शकते. विशेषकरून जेव्हा याचा वापर आजाराच्या सुरुवातीच्या स्टेजमध्ये केला जातो. यामुळे फुफ्फुसांवर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यांनी कोविड इन्फेक्शनच्या दरम्यान औषधांच्या दुरुपयोगाबाबत सावध केले आहे.

डॉ. गुलेरिया यांनी म्हटले, लोकांना वाटते की, रेमेडिसविर आणि अनेक प्रकारची स्टेरॉईड उपयोगी येतील. परंतु लोकांना हे माहित नाही की, यांची आवश्यकता नेहमी नसते. अशाप्रकारची औषधे किंवा स्टेरॉईड केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच दिली जाऊ शकतात.

डॉ. गुलेरिया यांनी पुढे म्हटले, कोविड-19 चे दोन टप्पे असतात. पहिला, जेव्हा शरीरात व्हायरस पसरल्याने ताप किंवा कंजेशनची समस्या होते. अनेकदा व्हायरस फुफ्फुसांमध्ये पसरू लागतो आणि ऑक्सीजनची लेव्हल अचानक कमी होऊ लागते तेव्हा अँटी वायरल ड्रग्ज दिले जाते.

तर, दुसरा टप्पा तेव्हा येतो, जेव्हा संक्रमित व्यक्तीची इम्यून सिस्टम काम करणे बंद करते आणि बॉडीत इन्फ्लेमेटरी रिअ‍ॅक्शन वाढू लागतात. हिच ती वेळ असते जेव्हा रूग्णाच्या शरीराला स्टेरॉईडची आवश्यकता असते. जर हे सुरुवातीच्या स्टेजमध्येच दिले गेले तर शरीरात वायरल रेप्लीकेशनला सुद्धा प्रोत्साहन देऊ शकतात. म्हणजे शरीरात व्हायरस दुप्पट वेगाने आपली संख्या वाढवू शकतो.