पार्थ पवारांनी घेतला पिंपरी-चिंचवडमधील ‘कोरोना’ स्थितीचा आढावा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राष्टृवादीचे युवा पदाधिकारी पार्थ पवार यांनी पिंपरी चिंचवडचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची शनिवारी अचानक भेट घेऊन शहरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर महापालिकेच्या प्राथमिक शिक्षकांना 7 वा वेतन लागू करण्याबाबत चर्चा केली. त्याचबरोबर कोरोना परिस्थितीवर लक्ष ठेण्यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी उभारलेल्या वॉर रूमलाही भेट दिली.

पार्थ पवार यांनी भेटी बाबत अत्यंत गुप्तता पाळली होती. राष्ट्रवादीच्या कोणत्याही स्थानिक नेत्यांना सोबत न घेताच पार्थ महापालिकेत जाऊन आयुक्तांची भेट घेतली. पिंपरी चिंचवडमध्ये लॉकडाऊनच्या काळात शेकडो कामगार,मजूर स्थलांतरित झाले. अनेकांची उपासमार झाली , हजारो लघु उद्योग बंद पडण्याच्या परिस्थितीत गेले आहेत, शेकडो तरुण ,आय. टी. कर्मचारी बेरोजगार झाले तेव्हा पार्थ कुठे होते? असा प्रश्न विचारला जात आहे. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे चित्र आहे.

आत्तापर्यंत 138 रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णांसाठी बेड उपलब्ध नाहीत. उपचार घेणार्‍या रुग्णांना नीट सुविधा मिळत नाहीत. कोरोनाच्या काळात केल्या गेलेल्या कोट्यवधींच्या खरेदीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. या प्रश्नांचा जाब विचारणे अपेक्षित असताना पार्थ पवार अशी गुपचूप बैठक घेऊन स्वत:च त्याचा गव गवा करत निघून जातात या बाबतही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like