‘कोरोना’विरुद्ध लढण्यासाठी PM मोदींनी बनवल्या 10 ‘टीम’, त्यांच्याच खांद्यावर आता संपूर्ण ‘जबाबदारी’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूविरूद्ध लढा देण्यासाठी 10 संघांची स्थापना केली आहे. मोदी सरकारने या साथीचे निर्मूलन करण्यासाठी आणि सरकारी उपाययोजनांची योग्य अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी अधिकारी आणि तज्ज्ञांच्या 10 वेगवेगळ्या सशक्त संघांची स्थापना करण्यात आली आहे.

– COVID-19 हॉटस्पॉट्समध्ये डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचार्‍यांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी नीति आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके. पॉल यांच्या नेतृत्वात एक मेडिकल इमरजेंसी रिस्पॉन्स टीमची स्थापना करण्यात आली आहे.

– त्याचप्रमाणे फॉर्मा सेक्रेटरी पीडी वाघेला यांच्या नेतृत्वात आणखी एक टीम स्थापन करण्यात आली आहे, ज्यांचे काम नियमितपणे व्हेंटिलेटर तसेच संरक्षक गीअर्स, मास्क व सॅनिटायझर्स सारख्या वैद्यकीय उपकरणाचा पुरवठा करणे हे आहे. या गटात एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांचादेखील समावेश आहे.

– पर्यावरण सचिव सी. के. मिश्रा यांच्या नेतृत्वात एक टीम तयार केली गेली आहे, ज्यांचे कार्य देशभरात पुरेशी रुग्णालये आणि क्वारंटाईन च्या सुविधा सुनिश्चित करणे आहे.

– सेक्रेटरी रँकचे अधिकारी अरुण पांडा यांना मोठ्या संख्येने लोकांना साथीच्या आजारावर सामोरे जाण्यासाठी तयार करण्यासंदर्भात मानव संसाधन आणि क्षमता निर्माण करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाने जबाबदारी सोपविली आहे.

– याशिवाय, देशभरात अन्न व औषधांची कमतरता भासू नये आणि ते राज्य सरकारांशी सातत्याने संपर्कात राहतील, या उद्देशाने एक स्वतंत्र टीम तयार करण्यात आला आहे.

– नीति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अमिताभ कांत यांच्याकडे प्रतिसादाशी संबंधित कामांसाठी खासगी क्षेत्र आणि आंतरराष्ट्रीय संस्थांशी समन्वय साधण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

– साथीच्या रुग्णांसाठी आर्थिक आणि कल्याणकारी उपाययोजना तयार करण्याची जबाबदारी आर्थिक व्यवहार सचिव अतनू चक्रवर्ती यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

– माहिती व प्रसारण (I&B) चे सचिव रवी मित्तल यांच्याकडे जनतेची माहिती हाताळण्याची आणि जनजागृती मोहीम राबवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

– मानव संसाधन विकास (HRD) सचिव अमित खरे यांच्यावर जनतेच्या तक्रारींचे निवारण करण्याची आणि कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी उपाययोजना सुधारण्याचे मार्ग सुचवण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

– आयटी सचिव अजय साहनी यांना साथीच्या आजाराशी संबंधित डेटा व्यवस्थापित करण्याचे काम देण्यात आले आहे.