Coronavirus : ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रेग्नंट महिलांनी ‘ही’ काळजी घ्यावी, जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) सांगितलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सध्या कोरोना व्हायरसमुळे देशात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्व देशातील वैज्ञानिक वेगवेगळ्या पद्धतीने याचा उपचार शोधण्यात व्यस्त आहे. त्याचबरोबर पुर्ण देशात सध्या लॉकडाऊन आहे त्यामुळे सर्वांना बाहेर न पडण्याची विनंती सरकारने केली आहे. अशा मध्ये आपण घरी राहून आपली काळजी घेतली पाहिजे. विशेषतः गर्भवती महिलांनी स्वतःची काळजी जास्त घेतली पाहिजे. गर्भवती महिलांनी काय काळजी घ्यावी ते आपण सविस्तर जाणून घेऊया.

पहिले जाणून घेऊया की, गर्भवती महिलांना कोरोनाची लागण होण्याचा धोका का असतो?
गर्भवती महिलांच्या शरीरामध्ये गर्भपणाच्या काळात अनेक बदल होत असतात. त्यांच्या प्रतिकारशक्तीमध्ये देखील बदल होत असतात. त्यामुळे त्यांना श्वसना संबंधीचे आजार होण्याचा धोका असतो. गर्भवती महिलांना ताप, सर्दी आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्यास त्यांनी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

गर्भवती महिलांनी कोणती काळजी घ्यायला पाहिजे?
त्यांनी सॅनिटायझरने किंवा साबणाने वारंवार हात धुणे गरजेचे आहे. त्यांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळले पाहिजे. त्याचबरोबर नाक, डोळे, तोंडाला स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यावी.

या महिलांना कोरोना असल्याचा संशय असल्यास त्यांची चाचणी कशी करावी?
गर्भवती महिलेची चाचणी प्राधान्याने करणे गरजेचे आहे. याउलट त्यांची विशेष काळजी घ्यायला हवी.

आईकडून मुलाला कोरोनाचा संसर्ग होता का?
आईकडून मुलाला कोरोनाचा संसर्ग होतो की नाही याबाबत अजूनही माहिती मिळाली नाही. मात्र, गर्भजल किंवा मातेच्या दुधामध्ये कोरोना विषाणू आढळून आले नाही.

महिलेला कोरोनाची लागण झाल्यास कोणती काळजी घेणे गेरजेचे आहे?
अशावेळी गर्भवती महिलेची खूप काळजी घेणे गरजेचे आहे. यादरम्यान त्यांना अत्युच्च दर्जाची वैद्यकीय सेवा मिळाली पाहिजे. त्याचबरोबर महिलेवर उपचार करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संवाद साधून त्याबद्दल सूचना देणे गरजेचे आहे. रुग्णाची स्वच्छता राखली पाहिजे. महत्वाचे म्हणजे रुग्णावर उपचार करणाऱ्या व्यक्तींनी संपूर्ण सुरक्षा पोषाख परिधान केला पाहिजे. अशावेळी माता आणि नवजात बालकाला सन्मानाची वागणूक देणे गरजेचे आहे.

का करावे कोरोना बाधित गर्भवती महिलेचे सिझेरियन?
केवळ वैद्यकीय गरज असल्यासच सिझेरियन केले जावे. जर महिलेची सिझेरियन करण्याची इच्छा असली तरच सिझेरियन करता येईल.

कोरोनाची लागण झालेली महिला आपल्या नवजात बाळाला स्तनपान करु शकते का?
कोरोनाची लागण झालेली महिला आपल्या बाळाला स्तनपान करु शकते. त्यासाठी त्या महिलेने आपल्या हाताची स्वच्छता राखणे गरजेचे आहे. स्तनपान करताना मास्कचा वापर करावा. त्याचबरोबर बाळाला घेण्यापुर्वी आपले हात स्वच्छ धुवावे. ज्या खोलीत महिला वावरत असाल ती खोली स्वच्छ देखील ठेवणे गरजेचे आहे.