Coronavirus Lockdown : राजस्थानमध्ये ‘लॉकडाऊन’ दरम्यान रामनवमीला यात्रा, झाली प्रचंड गर्दी

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – देशात कोरोनाने धूमाकुळ घातला आहे, परंतु या दरम्यान राजस्थानच्या बुंदीमध्ये अंधश्रद्धेने असा काही कहर केला की शेकडो लोकांनी गर्दी झाली. देशात लॉकडाऊन असताना राजस्थानात 144 लागू असता लोक मोठ्या संख्येने येथे जमले होते. दरवर्षीप्रमाणे नवरात्रीच्या आयोजित कार्यक्रमात देखील लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

राजस्थानच्या बुंदी जिल्ह्यात रामनगर आणि लाखोरी भागात अंधश्रद्धा पसरवल्या प्रकरणी बुंदीच्या पोलिसांननी आतापर्यंत 5 लोकांना अटक करण्यात आली आहे.

घरांच्या छतांवर, रस्त्यांंवर गर्दी –
अंधश्रद्धेचा खेळ गल्ली बोळात सुरु होता, लोक घराच्या छतावर, रस्त्यावर गर्दी करत होते. अंधश्रद्धेच्या वेगवेगळ्या करामती दाखवण्यात येत होत्या. लोक हे पाहण्यासाठी गर्दी करत होते.

बुंदीच्या लाखेरी भागात माताजीच्या मंदिरात हे दृष्य पाहायला मिळाले. जेथे लोक गर्दी करु लागले. घटनास्थळी पोहोचलेल्या लोकांना पोलिसांनी घरी जाण्यास सांगितले. बऱ्याच प्रयत्नानंतर लोकांना आणि मंदिराच्या पुजाऱ्यांना समजावण्यात आले.

रामनगरमध्ये प्रकरणं थोडे वेगळे होते, जेथे घराच्या छतापासून जमिनीवर लोकांची गर्दी झाली होती. तेथे देखील अंधश्रद्धेचा खेळ सुरु होता. या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतले आहे.

रामनगरमध्ये नवमीच्या संध्याकाळी दशमीच्या दिवशी अंधश्रद्धेचा खेळ सुरु होता. येथे लोकांची गर्दी झाली होती. येथे लोक दरवर्षीप्रमाणे करामती दाखवण्यासाठी एकत्र आले होते. माहिती मिळाल्याने संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी हे प्रकरण शांत केले आणि लोकांना आपापल्या घरी जाण्यास सांगितले. या प्रकरणी 5 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.