ICMR पर्यंत पोहचला ‘कोरोना’, वरिष्ठ वरिष्ठ वैज्ञानिकास ‘संसर्ग’ झाल्याची पुष्टी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूने देशात थैमान घातले. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना कोरोना विषाणूने आयसीएमआर म्हणजेच इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल सायन्सेस मध्येही शिरकाव केला आहे. आयसीएमआरच्या वरिष्ठ वैज्ञानिकास  कोरोना विषाणूची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर आयसीएमआरची संपूर्ण इमारतीचे निर्जंतुकीकरण केली जात असल्याची माहिती सुत्रांनी दिली. मुंबईतील शास्त्रज्ञ काही दिवसांपूर्वी दिल्ली येथे गेले होते आणि रविवारी सकाळी त्यांना कोरोना झाल्याची पुष्टी झाली.

आयसीएमआर मुंबईच्या राष्ट्रीय पुनरुत्पाक आरोग्य संशोधन संस्थेचे हे वैज्ञानिक आहेत. एका सुत्राने सांगितले की, आयसीएमआर इमारतीत निर्जंतुकीकरण करण्यात येईल आणि दोन दिवसांत फ्यूमिगेशन (धूर) करण्यात येईल. वैज्ञानिक मागील आठवड्यात एका बैठकिसाठी दिल्लीत येथे गेले होते. यावेळी आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव हे देखील बैठकीला उपस्थित होते.

सुत्रांनी सांगितले की, प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना निरोप पाठवण्यात आला असून कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कारण आयसीएमआर मुख्यालयात निर्जंतुकीकरण करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आलेल्या निरोपात म्हटले आहे की, कोविड 19 ची मुख्य टीम केवळ तेव्हाच येऊ शकते जेव्हा अतिशय महत्त्वाचे काम असेल. तोपर्यंत इतरांनी घरातूनच काम करावे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like