रेमेडिसीवीर हे जीवनरक्षक औषध नाही, डॉ. अमोल कोल्हेंनी सूचवला पर्याय, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामना ऑनलाइन – राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण येत आहे. त्यातच ऑक्जिसन बेड आणि रेमेडिसीवीरच्या इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. तसेच रेमेडिसीवीर हे जीवनरक्षक औषध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले असून पर्यायी औषधही सूचवले आहे. जर रुग्ण तोंडावाटे औषध घेत असेल, ओरव्ल इंजेक्शन घेण्यास तो सक्षम असेल तर रेमेडिसीवीर उपलब्ध होईपर्यंत रुग्णाला तोंडावाटे फेव्हीपॅरावीर औषध द्यावेत, असा पर्याय डॉ. कोल्हे यांनी सांगितला आहे. तसेच महाराष्ट्रात फेव्हीपॅरावीरचा साठा उपलब्ध असल्याचेही कोल्हे यांनी संगितले आहे.

राज्यातील रेमडिसिवीरचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. परंतु वाढती रुग्णसंख्येमुळे यावर मर्यादा येत आहेत. पुरवठा सुरळीत होईपर्यंत कोविड टास्क फोर्सने सुचविलेली औषधे रुग्णांना देता येतील. पुन्हा एकदा सांगू इच्छितो की, रेमडिसिवीर हे जीवनरक्षक औषध नाही. त्यामुळे ते रुग्णांना देताना डॉक्टरांनी पुरेशी काळजी घ्यावी. तसेच उपलब्ध साठा काळजीपूर्वक वापरुन गरज असणाऱ्या रुग्णांनाच द्यावे, अशी माझी विनंती असल्याचे ट्विट डॉ. कोल्हे यांनी केले आहे. राज्यातील टास्क फोर्सच्या डॉक्टरांनी एक गोष्ट वारंवार सांगितली आहे. रेमडिसीवीर हे जीनवरक्षक औषध नाही. रेमडिसीवीरमुळे शरीरातील विषाणूचा व्हायरल लोड कमी होऊ शकतो. पण रेमडिसीवीरमुळे रुग्णाचा जीव वाचतो, असे नाही. रुग्णालयातील रुग्णाचा मुक्काम काही काळ कमी होईल, पण हे इंजेक्शन जीवनरक्षक नाही, असे कोल्हे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे.