‘कोरोना’चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय ? घाबरून न जाता सर्वप्रथम ‘या’ नियमांचे करा पालन, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोना विषाणू सोबत लढण्यासाठी संपूर्ण जगणे कंबर कसली आहे. यात भारत आघाडीवर आहे. भारतामध्ये रोज ८० ते ९० हजार रुग्ण सापडत आहेत. तरीही इतर देशाच्या तुलनेत देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे. आज देशातील जवळपास ८१ टक्के रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या काळात असा एकही व्यक्ती नसेल ज्याच्या मनात ‘मला कोरोना तर झाला नाही’ असा विचार आला नसेल. लोकांच्या मनात ह्या कोरोनाविषयी भीती असली तरी त्याबद्दल कसा बचाव करावा हे देखील माहिती आहे. मात्र तुमचा किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर सर्वात आधी काय करावे हे समजून घ्या.

अहवाल पॉझिटिव्ह आल्यास घरातच विलगिकरण व्हा आणि कुटुंबातील इतर सदस्यांच्या संपर्कात येऊ नका.

24×7 मास्क घाला आणि वापरानंतर त्याची योग्य विल्हेवाट लावा.

विलगिकरणात असताना कुटुंबातील सदस्यांपासून 6 फूट राखा.

वेळोवेळी ताप मोजत रहा.

जर तुमचा अहवाल पॉझिटिव्ह आला आणि तुम्हाला कोणतीही लक्षणे नसली तरी वरील नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. यासह तुम्हाला लक्षणे जाणवत असतील आणि अहवाल येण्यास काही काळ जाणार असेल तरीही वरील स्वतःला कोरोना रुग्ण समजून नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. लक्षणे नसतानाही अहवाल पॉझिटिव्ह आल्यास स्वतःला 10 दिवस घरात क्वारंटाईन करून घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य ते उपचार करा. 10 दिवसानंतर कोणतेही लक्षण न आढळल्यास आयसोलेट राहण्याची गरज नाही.