कोरोनाच्या संकटात ‘हा’ देश भारताच्या मदतीला; 2 विमाने दिल्लीत दाखल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात कोरोना विषाणूने हाहाकार केला असून, दैनंदिन बाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. या परिस्थितीत विविध देश भारताच्या मदतीला धावून येत आहेत. भारताचा जवळचा संबंध असणारा देश म्हणजे रशियाने आता भारतात २ विमाने पाठवली आहे. या विमानामध्ये कोरोना बाधित रुग्णांसाठी अधिक ऑक्सीजन, ७५ व्हेंटिलेटर, १५० बेड साइड मॉनिटर आणि फॅबिपिराविर औषध यामधून पाठवले आहे. याबाबत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अरिंदम बागची यांनी ट्विटरद्वारे माहित दिलीय.

कोरोनाच्या परिस्थितीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात चर्चा झाली. यावेळी अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी भारताला शक्य होईल तेवढे सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन दिले. याव्यतिरिक्त रशियाची स्पुतनिक-व्ही ही लस मे महिन्यामध्ये भारतात पोहोचण्यास प्रारंभ होणार आहे. तसेच या लशीचे भारतामध्ये देखील उत्पादन करण्यात येणार आहे.

या दरम्यान, मागील वर्षी महामारीच्या सुरुवातीच्या कालावधीत भारताने आपल्या मैत्रिचा परिचय देत रशियाला हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा इमरजन्सी पुरवठा केला होता. आम्हाला ती मदत लक्षात आहे. असे रशियाच्या राजदूतांनी म्हटले आहे. तसेच अति प्रसंगी कालावधीत परस्परांस सहकार्य करूनच आपण या कोरोना महामारीला हरवू शकणार आहे. तर रशियाच्या राजदूतांनी म्हटलं की, आम्ही कोरोनाचा सामना करण्यासाठी भारताला पाठविलेली मदत भारतासाठी लाभदायक ठरेल, अशी आम्हाला आशा आहे.