लॉकडाऊनमध्ये नव्हती मिळत प्यायला दारू, म्ह्णून संपूर्ण दुकानच लुटून नेले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी देशभर लॉकडाउन सुरूच आहे. ज्यामुळे सर्व वाहतूक, दुकाने, सेवा बंद करण्यात आल्या आहे, यादरम्यान नशा करणारे लोक विशेषत: अस्वस्थ आहेत. लॉकडाऊनमुळे ते अल्कोहोल घेऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत आसाममधील शिवसागरमध्ये काही अज्ञातांनी दारूच्या दुकानात तोडफोड करत लाखो रुपयांच्या दारूच्या बाटल्या चोरून नेल्या.

मंगळवारी सायंकाळी शिवसागर नगर भागात ही घटना घडल्याचे समजते. लॉकडाऊनच्या परिस्थितीचा फायदा घेत अज्ञातांनी शिवसागर स्टेशन येथील चारली परिसरातील दारू दुकानात दरोडेखोरांनी लूटमार केली. दारू दुकानाचे मालक शैलधर बरुआ म्हणाले की, “दुकानात चोरी झाल्यानंतर काही लोक त्या भागात दारूच्या बाटल्या विकत असल्याचे समजते आणि ती दारू माझ्याच दुकानातून चोरी केली गेली होती.”

ते म्हणाले, “मंगळवारी संध्याकाळी जेव्हा मी त्याच्या दारूच्या दुकानात गेलो असता पाहिले की दरोडेखोरांनी दारूच्या दुकानात तोडफोड केली आणि दारूच्या बाटल्या नेल्या. तसेच रोख बॉक्समधून सुमारे दहा हजारांची रोकड लुटली. मी ताबडतोब स्थानिक पोलिसांना या संदर्भात माहिती दिली आणि पोलिसांची टीम या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी येथे आली. “