Benefits of Giloy : इम्युनिटीसाठी किती लाभदायक गुळवेल? ‘हे’ 5 रोगसुद्धा राहतील शेकडो मैल दूर

कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेने संपूर्ण देशात कहर चालवला आहे. अशावेळी आपल्या इम्यूनिटीची काळजी घेणे खुप आवश्यक झाले आहे. इम्यूनिटी वाढवण्यासाठी लोक अनेक प्रकारची औषधे घेतात आणि महागड्या डाएटवर विश्वास ठेवत आहेत. परंतु ती वाढवण्यासाठी स्वता आणि नैसर्गिक उपाय सुद्धा आहेत. हेल्थ एक्सपर्ट दावा करतात की गुळवेलीची पाने उकळून प्यायल्याने इम्युनिटी वाढवता येऊ शकते. काही लोक तर याची पाने इतर फळांसह ज्यूसमध्ये मिसळून पितात.

मेटाबॉलिज्म सिस्टम, ताप, खोकला, सर्दी आणि गॅस्ट्रोइंटसटाइनल शिवाय अनेक मोठ्या आजारावर हे उपयोगी आहे. उकळलेले पाणी किंवा ज्यूससह, चहा किंवा कॉफीमध्ये सुद्धा याचा वापर करू शकता. विज्ञान जगतातील मोठ्या व्यक्ती सुद्धा गुळवेलच्या पानांना चांगला आयुर्वेदिक उपचार मानतात.

हे आहेत फायदे
1. गुळवेल सेवनाने अ‍ॅनिमिया दूर होण्यास मदत होते. हे तूप आणि मधासोबत मिसळून घेतल्यास रक्ताची कमतरता दूर होते.

2. काविळीच्या रूग्णांसाठी गुळवेलीची पाने लाभदायक आहेत. याचे चूर्ण करून काहीजण घेतात तर काहीजण पाने पाण्यात उकळून पितात. याची पाने वाटून मधासोबत सुद्धा घेऊ शकता.

3. हाता-पायांची जळजळ किंवा स्कीन अ‍ॅलर्जीवर उपयोगी आहे. गुळवेलीची पाने वाटून पेस्ट तयार करावी आणि ती सकाळ-संध्याकाळ हाता-पायाला लावा.

4. पोटाशी संबंधीत अनेक आजारावर गुळवेल लाभदायक आहे. यामुळे बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या दूर होते शिवाय पचन व्यवस्थित होते.

5. गुळवेलचा वापर ताप आणि सर्दी दूर करण्यासाठी केला जातो. खुप दिवसांपासून ताप असेल आणि कमी होत नसेल तर गुळवेलच्या पानांचा काढा प्यायल्याने फायदा होतो.