सरकारी रुग्णालयातून रेमेडीसीवीरचे 850 डोस लंपास, वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  देशभरात कोरोनाच्या दुस-या लाटेने थैमान घातले आहे. त्यामुळे अनेक राज्यात रेमेडिसीवीर इंजेक्शनचा तुटव़डा निर्माण झाला आहे. परिणामी अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरु आहे. अशातच भोपाळमधील हमीदी या सरकारी रुग्णालयातून रेमडिसवीर इंजेक्शनचे तब्बल 850 डोस चोरट्यांनी लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांना रुग्णालयातील स्टाफनेच मदत केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान इंजेक्शनची चोरी झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

भोपाळमधील हमीदी या सरकारी रुग्णालयात काही दिवसापूर्वीच रेमडिसीव्हीर इंजेक्शनचा साठा आला होता. मात्र, कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने इंजेक्शनची मागणी वाढली असून मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे चोरट्यांनी रुग्णालयातील रेमेडिसीवीरच्या बॉक्सवरच डल्ला मारला आहे. औषधे ठेवलेल्या खोलीची खिडकी तोडून हे इंजेक्शन लंपास केले आहेत. याप्रकरणी कोहेफिजा पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. राज्यात आत्तापर्यत 42 हजार इंजेक्शनचा पूर्तता झाल्याचे मध्यप्रदेश सरकारने म्हटले आहे. सरकारने 50 हजार इंजेक्शनची ऑर्डर दिली असून 9,788 इंजेक्शनचा पुरवठा आजच करण्यात येणार आहे. उर्वरीत इंजेक्शन पुढील 3 दिवसांत मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान महाराष्ट्रात अशी बिकट परिस्थिती असताना मंत्री नवाब मलिकांनी खळबळजनक दावा करत केंद्रावर गंभीर आरोप केले आहेत. मलिक यांनी ट्विट करून म्हटले आहे की, रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करणाऱ्या 16 कंपन्यांना ठाकरे सरकारने विचारलं असता त्यांनी केंद्र सरकारने महाराष्ट्राला औषध पुुरवू नका, असे सांगितल्याचा खळबळजनक दावा केला आहे. जर या कंपन्यांनी महाराष्ट्राला औषध पुरवली तर त्यांचा परवाना रद्द करू अशी धमकी केंद्र सरकारने कंपन्यांना दिल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे.