‘चिट्टियां कलाईयां’ फेम गायिका कनिका कपूरचा कबुलीनामा, म्हणाली – ‘मला करोना झालाय, यावेळी आयसोलेशनमध्ये आहे’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – पार्श्वगायिका कनिका कपूर कोरोनाग्रस्त आढळल्यानंतर संपूर्ण बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. असे सांगण्यात येत आहे की कनिका 15 मार्चला लंडनहून परत भारतात आली होती. परतल्यानंतर तिने रविवारी गॅलेंट अपार्टमेंटमध्ये एक पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये अनेक दिग्गज उपस्थित होते. त्यामुळे भीती व्यक्त होत आहे की कनिकाच्या संपर्कात आलेल्यांना तर कोरोनाचे संक्रमण झाले नसेल.

कनिकाने सांगितली आपबीती
कनिकाने या घटनेनंतर इंस्टाग्रामवर एक भली मोठी पोस्ट शेअर केली. त्यात तिने आपल्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला. ती म्हणाली, मागील चार दिवसांपासून मला फ्लू आहे. मी माझी चाचणी करुन घेतली त्यात मी पॉझिटिव्ह आले. सध्या मी क्वारेंटाइन आहे. डॉक्टरांच्या सल्लाने माझी ट्रिटमेंट सुरु आहे. मी ज्या लोकांच्या संपर्कात आले त्यांची देखील तपासणी केली जात आहे. मला 10 दिवसांपासून विमानतळावर स्कॅन केले होते पंरतु मागील 4 दिवसांपासून माझ्यात कोरोनाचे लक्षण जाणवायला लागले.

मी सर्वांना विनंती करते तुम्ही सर्वांनी जास्तीत जास्त एकटे रहा आणि कोरोनाची लक्षण दिसत असतील तर तात्काळ चाचणी करुन घ्या. आपण एकत्र मिळून सरकारकडून देण्यात आलेल्या निर्देशांचे पालन केले तर आपण या सर्वांतून बाहेर निघू शकतो.

https://www.instagram.com/p/B98tXqnFqE2/?utm_source=ig_web_copy_link

विमानतळावर कनिकाचे चेकअप झाले होते ?
असे सांगण्यात येत आहे की कनिका कपूर एअरपोर्टवरुन चेकअप शिवाय गेली होती, ती ग्राऊंड स्टाफच्या मदतीने तेथून तसेच निघून गेली होती. परंतु इंस्टाग्रामवर तिने सांगितले की तिने चेकअप केले होते. परंतु या दोन्ही दाव्यात किती तथ्य आहे हे वेळ आणि काळच सांगेल, परंतु कनिका आता कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने तिच्या चाहत्यांची चिंता वाढली आहे.