Corona Virus : स्पेनमध्ये फोफावला ‘कोरोना’ व्हायरस, हॉटेलमध्ये अडकले शेकडो लोक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संपूर्ण जगावर कोरोना व्हायरसमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. आतापर्यंत या धोकादायक व्हायरसने अनेक लोकांचा मृत्यू झाला. स्पेनमध्ये एका इटालियन डॉक्टरने कोरोना व्हायरसची लक्षणे दिसल्याने कॅनरी द्विप स्थित टेनेरिकचे एक हॉटेल लॉकडाऊन (बाहेर आत जाण्यास बंदी) करण्यात आले आहे.

स्पॅनिश मीडियाच्या मते, एच – 10 कोस्टा एडीजे पॅलेस हॉटेलच्या शेकडो पाहुण्यांना त्यांच्या रुममध्येच राहण्यास सांगितले आहे. या लोकांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल.

corona spain

काही वृत्तानुसार, हे डॉक्टर लोम्बार्डी क्षेत्रातील आहेत. जेथे इटालियन अधिकारी व्हायरसच्या प्रकोपाने बाधित झाले आहेत. तर एका वृत्तात पोलीस सूत्रानुसार सांगण्यात आले की आरोग्य अधिकाऱ्यांनी एका बंदरावरुन फोर स्टार हॉटेलमधील पाहुण्यांची देखरेख करण्याचे आदेश दिले आहेत.

हॉटेलमध्ये थांबलेल्या एका व्यक्तीने मंगळवारी फेसबूकवर आपल्या रुमच्या खाली देण्यात आलेल्या सूचनेचा फोटो काढून पोस्ट केला. यात लिहिले गेले की, आम्ही खेद व्यक्त करतो की आरोग्याच्या कारणाने हॉटेल बंद करण्यात आले आहेत. जोपर्यंत आरोग्य अधिकारी परवानगी देत नाहीत तोपर्यंत तुम्हाला तुमच्या रुममध्येच रहावे लागेल.

हॉटेलमध्ये थांबलेल्या अन्य एका पाहुण्याने जॉन टर्टन यांनी सांगितले की त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने चेतावनी नोटीस वाटले, ज्यानंतर ते हॉटेलमध्ये थांबले. कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात भीतीचे वातावरण पसरवले आहे. चीनमध्ये या व्हायरसचे अनेक प्रकरणं समोर आली. जेथे आतापर्यंत 80,000 लोकांना संक्रमण झाले आहे.