महिला T -20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ‘कोरोना’ग्रस्त व्यक्ती स्टेडियममध्ये, प्रचंड खळबळ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला टी -20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यावेळी कोरोना विषाणूची लागण झालेला व्यक्तीही प्रेक्षकांमध्ये बसला होता. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड (एमसीजी) प्रंबधन यांनी ट्विटद्वारे याची पुष्टी केली आहे. ट्वीटमध्ये, एमसीजीने म्हटले आहे की अंतिम सामन्यात कोरोना-संक्रमित प्रेक्षक होता पण त्याचा धोका इतरांना कमी झाला असावा.

महिला टी -20 विश्वचषक फायनल ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न येथे झाला. तेथे कोरोनाव्हायरस ग्रस्त रुग्ण देखील आहेत. इतकेच नाही तर कोरोनातील 70 रूग्णांवर उपचार करणार्‍या डॉक्टरांनाही कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे.

या सामन्यात यजमान संघ ऑस्ट्रेलियाने भारताचा 85 धावांनी पराभव करत महिला टी -20 स्पर्धेत पाचव्यांदा विक्रम जिंकला. हा सामना पहाण्यासाठी 86174 लोक आले होते, महिला क्रिकेट सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांची ही विक्रमी संख्या आहे.

कोरोनाव्हायरसमुळे जगभरात जाहीर सभा, चर्चासत्रे, खेळांचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. पण ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न येथे झालेल्या महिला टी -20 विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलियन महिला संघ यांच्यात खेळला गेला.

आरोग्य व सार्वजनिक सेवा विभागाने संबंधित व्यक्तीला उपचार घेण्याचा सल्ला दिला आहे. यासह, आसपासचे नागरिक आणि स्टाफ यांच्यामध्ये कोविड-19 प्रसार झाला आहे का याची खबरदारी घ्यायला सांगितली आहे.

ही व्यक्ती एमसीजीच्या ए 42 मधील नॉर्दर्न स्टँडच्या लेव्हल 2 वर बसली होती. आरोग्य आणि लोक सेवा विभागाने असा सल्ला दिला आहे की एन 42 मध्ये बसलेल्या लोकांनी आपली नेहमीची दिनचर्या चालू ठेवली पाहिजे आणि स्वच्छतेकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. असेही म्हटले आहे की जर आपल्याला खोकला आणि सर्दी सारखी लक्षणे दिसली तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

न्यूज डॉट कॉम. एयु च्या म्हणण्यानुसार, आत्ता ऑस्ट्रेलियामध्ये 112 लोकांना कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे. तर ३ जणांचा मृत्यू झाला आहे.

महिला टी -20 वर्ल्ड कपचा अंतिम सामना मेलबर्न येथे झाला. मेलबर्न व्हिक्टोरिया प्रांताची राजधानी आहे. व्हिक्टोरिया प्रांतात एकूण 11 संक्रमित लोक आहेत.

पण मेलबर्न येथे राहणाऱ्या एका डॉक्टरलाही कोरोना इन्फेक्शन झाले आहे. या डॉक्टरने मालवेर्न रोडवरील टूरक क्लिनिकमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये एकूण 70 कोरोना रुग्णांना पाहिले होते . यानंतर तो स्वत: आजारी पडला आहे.

आता या डॉक्टरने स्वत: ला मेलबर्नमधील घरात बंद करून घेतले आहे. जेणेकरून त्याच्यामुळे इतर कोणासही संक्रमन होऊ नये.