Coronavirus in India : कोरोनाची विक्रमी ‘झेप’ ! 24 तासात 2 लाख 60 हजार पेक्षा जास्त नवे पॉझिटिव्ह तर 1495 लोकांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना व्हायरस महामारी दिवसेंदिवस विक्राळ होत चालल्याचे दिसत आहे. मागील 24 तासात कोरोनाने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडले आहेत. मागील 24 तासात भारतात कोरोनाची 260778 नवी प्रकरणे समोर आली आहेत. तर 1495 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

जगभरात आतापर्यंत कोरोनाची 141,305,237 प्रकरणे समोर आली आहेत. तर एकुण 3,023,871 जणांना आपला जीव गमावला आहे. जगभरात कोरोनातून बरे झालेल्या लोकांची संख्या 119,918,188 झाली आहे. जगभरात सध्या सक्रिय प्रकरणांची संख्या 18,363,178 आहे.

अमेरिकेनंतर भारत दुसर्‍या नंबरवर
कोरोनाने सर्वात जास्त प्रभावित देशांच्या बाबतीत भारत दुसर्‍या नंबरवर आहे. पहिल्या नंबरवर अमेरिका आहे, जिथे कोरोनाची आतापर्यंत एकुण 32,372,119 प्रकरणे नोंदली गेली आहेत. येथे आतापर्यंत कोरोनाने 580,756 लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत कोरोनातून 24,905,332 लोक बरे झाले आहेत तर 6,886,031 सक्रिय प्रकरणे आहेत. भारतात आतापर्यंत कोरोनाची 14,782,461 प्रकरणे आहेत. 177,168 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 12,805,094 लोक कोरोनातून बरे झाले आहेत आणि सक्रिय प्रकरणांची संख्या 1,800,199 आहे.

या बाबतीत ब्राझील तिसर्‍या नंबरवर आहे. तर चौथ्या क्रमांकावर फ्रान्स, पाचव्यावर रशिया, सहाव्यावर ब्रिटन आहे. ब्राझीलमध्ये आतापर्यंत 13,900,134 प्रकरणे, फ्रान्समध्ये 5,260,182 प्रकरणे, रशियात 4,693,469 प्रकरणे आणि ब्रिटनमध्ये आतापर्यंत 4,385,938 प्रकरणे नोंदली गेली आहेत.

देशात ऑक्सीजनची टंचाई

बेड्स, औषधे आणि ऑक्सीजनच्या टंचाईचे अनेक प्रकरणे देशात समोर येत आहेत. महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडून एयरलिफ्ट करून 1200 ते 1500 मेट्रिक टन ऑक्सिजन मागितला आहे. तिकडे, एमपीच्या शहडोलमध्ये सुद्धा 6 कोविड रूग्णांचा ऑक्सीजन अभावी मृत्यू झाला आहे.