Coronavirus : फक्त 20 मिनिटात एकाकडून 4 लोकांमध्ये संक्रमित झाला ‘कोरोना’

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था  –  देशात कोरोना विषाणू (Covid-19) चे प्रमाण सातत्याने वाढतच आहे. अशा परिस्थितीत केरळ मधील कासरगोड (Kasargod) येथून एक असे वृत्त समोर आले, ज्याने लोकांना चकित करून सोडले. एका वृत्तानुसार, बुधवारी कासरगोड येथे जिल्हाधिकारी डी.सजीथ बाबू यांनी कोरोना विषाणू प्रकरणाविषयी मोठा खुलासा केला आहे. त्यांनी माहिती दिली की कोरोना विषाणू एका व्यक्तीपासून चार लोकांपर्यंत अवघ्या वीस मिनिटांत पसरला.

बाबू यांनी माहिती दिली की दुसर्‍या क्रमांकाचा रुग्ण १६ मार्च रोजी दुबईहून कासरगोड येथे आला होता. रुग्णाने तपासणीसाठी नमुने दिले आणि त्याला आयसोलेशन मध्ये राहण्यासाठी घरी पाठविण्यात आले. यानंतर तो घरात त्याची आई, पत्नी आणि मुलाला वीस मिनिटांसाठी भेटला, त्यानंतर ते सर्व २० मार्चला सकारात्मक आढळले. तसेच विमानतळावर त्याला घेण्यास गेलेला त्याचा एक मित्रही सकारात्मक आढळला आहे. सर्व संक्रमित लोकांना सध्या आयसोलेशन मध्ये ठेवले आहे.

एक संशयित तब्बल १४०० लोकांच्या संपर्कात आला होता

दुसऱ्या क्रमांकाच्या रुग्णाव्यतिरिक्त प्रशासनाला त्या व्यक्तीच्या रिपोर्टची देखील प्रतीक्षा आहे जो की रुग्ण क्रमांक तीन च्या संपर्कात आला होता. हा व्यक्ती ४७ वर्षांचा एरियल चा रहिवासी असणारा व्यावसायिक आहे जो की दुबईहून परतला आहे. असे होऊ शकते की कदाचित हा व्यक्ती चार जिल्ह्यांतील हजारो लोकांच्या संपर्कात आला असेल. कारण या व्यक्तीने अनेक क्लब, ३ विवाहसोहळे, एका अंत्यसंस्कार आणि इतर सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये भाग घेतला होता. ही व्यक्ती राज्यातील सुमारे १४०० लोकांच्या संपर्कात आली आहे.

कासरगोडची परिस्थिती समजून घेण्यासाठी बुधवारी झालेल्या तपासणीचे निकाल महत्वाचे आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की आम्ही चाचणीसाठी पाठविलेल्या ७७ नमुन्यांच्या निकालाची वाट पाहत आहोत, हा एक महत्त्वाचा दिवस आहे. आज चाचणीसाठी देण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये असे लोक समाविष्ट आहेत जे ४७ वर्षीय एरियल येथील निवासीच्या संपर्कात आले होते.

२१ मार्चपासून कासरगोड लॉकडाउन आहे

जिल्ह्यातील तपासणी किटची माहिती देताना जिल्हाधिकारी म्हणाले की, कासरगोड येथे १३ लाख लोक राहतात आणि सर्वांना चाचणी किट देणे शक्य नाही. ते म्हणाले की आमचे डॉक्टर आम्हाला सांगत आहेत की कोणाची तपासणी करावी आणि कोणाची तपासणी करू नये. आमच्याकडे १३ लाख किट्स नाहीत आणि आम्हाला प्रत्येक तपासणी करण्याचीही आवश्यकता नाही.

सध्याला केरळचा सर्वात असुरक्षित जिल्हा म्हणजे कासरगड येथे २१ मार्चपासून लॉकडाउन आहे. जिल्ह्यात सर्वाधिक संक्रमित रुग्ण आढळले आहेत. केरळमध्ये सध्या १२२ लोक संक्रमित आहेत, त्यापैकी ४१ लोक सकारात्मक आहेत.