Corona Virus : ‘कोरोना’चा जगभरात ‘हाहाकार’ ! ‘या’ पध्दपतीनं फोफावतोय ‘व्हायरस’, ‘हे’ आहेत उपाय, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात सध्या कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. चीनमधून सुरू झालेला हा व्हायरस आता खुप दूरपर्यंत पसरला आहे. भारतातील केरळ राज्यात या व्हायरसची लागण झालेले 3 रूग्ण सापडले आहेत. तर पंजाबमध्येही एक संशयित रूग्ण सापडल्याचे वृत्त आहे. केरळात तर यास राज्य आपत्ती म्हणून जाहीर करण्यात आले आहे.

असा पसरतो कोरोना व्हायरस

कोरोना व्हायरसचा संसर्ग एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीकडे पसरतो. यानंतर दुसरा व्यक्ती ग्रस्त होतो. संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या खोकण्याने आणि शिंकण्याने हे व्हायरस हवेतून डोळे, नाक आणि तोंडावाटे निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात. तसेच संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने, स्पर्श केल्याने, हात मिळवल्याने सुद्धा निरोगी व्यक्तीला याची लागण होते.

संक्रमित व्यक्तीची लाळ असू शकते अनेक गोष्टींवर

यापासून वाचण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. कारण गर्दीमध्ये या व्हायरसचा कुणाला संसर्ग झाला आहे का, हे समजू शकत नाही. कारण याची कोणतीही लक्षणे दिसत नसली, तरी व्यक्ती संक्रमित असू शकते. दरवाजाचे हँडल, ट्रेन आणि बसमध्ये उभे राहून प्रवास करताना पकडण्यात येणारे हँडल, मोबाईल, लॅपटॉप, कम्प्युटर माऊस, चॉप्सस्टीक, चहाचे कप, लिफ्टची बटने, जिन्याचा कठडा इत्यादीवर व्हायरसचा संसर्ग झालेल्या व्यक्तीची लाळ लागलेली असू शकते. यासाठी स्वत:च आपला बचाव करावा.