Coronavirus : ‘देशात सध्या व्हॅक्सीन ‘मिक्सिंग’ नाही, इतर देशांत रिसर्च जारी’ – नीती आयोग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरस Coronavirus संकटादरम्यान दिलासादायक बातमी आहे. आरोग्य मंत्रालयानुसार देशाच्या अनेक राज्यांमध्ये कोरोना व्हायरसच्या Coronavirus प्रकरणांमध्ये वेगाने घट दिसून येत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, सक्रिय प्रकरणे 50 टक्केपर्यंत कमी झाली आहेत.

चंद्रकांत पाटलांआधीच सांगोल्याच्या ‘या’ प्राध्यापकानं केली शरद पवारांवर PhD, पण…

तर आयसीएमआरचे डॉक्टर बलराम भार्गव यांनी म्हटले की, व्हॅक्सीनची टंचाई नाही. जुलै आणि ऑगस्टच्या मध्यापर्यंत आमच्याकडे दररोज एक कोटी लोकांना व्हॅक्सीनेट करण्याएवढी पुरेशी व्हॅक्सीन असेल. आम्हाला पूर्ण विश्वास ओह की, डिसेंबरपर्यंत आम्ही देशातील पूर्ण लोकसंख्येला व्हॅक्सीन देऊ. नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल यांनी म्हटले की, व्हॅक्सीनच्या डोसच्या शेड्यूलमध्ये कोणताही बदल नाही. कोविशील्डचे दोन डोस दिले जातील. कोव्हॅक्सीनसाठी अजूनही हाच नियम आहे. पहिल्या डोस नंतर दुसरा डोस 12 आडवड्यानंतर दिला जाईल.

Pune : निवडणुकीच्या तोंडावर स्थायी समितीतील ‘आर्थिक’ बाजार ‘गरम’ ! आक्षेप घेत रद्द केलेली 6.50 कोटी रुपयांची निविदा आठवड्याभरात फेरविचार देत मंजुर

व्हॅक्सीनच्या मिश्रणाबाबत डॉ. व्ही. के. पॉल यांनी म्हटले की, इतर देशांमध्ये यावर रिसर्च जारी आहे. हे विज्ञानाचे प्रकरण आहे. हा विषय अजून सुटलेला नाही. आम्ही यावर रिसर्च प्रोग्राम प्रमाणे काम करत आहोत. विज्ञानाला ते सोडवू द्या. तोपर्यंत व्हॅक्सीनची मिक्सिंग केली जाणार नाही.

READ ALSO THIS :

खुशखबर ! 18 ते 40 वर्षे वयोगटातील 10 वी पास उमेदवारांना पोस्टाच्या महाराष्ट्र विभागात नोकरीची सुवर्णसंधी, मुलाखतीविना 2428 पदांसाठी भरती; जाणून घ्या प्रक्रिया

 

लाल, गोड टरबूज ओळखण्याच्या अनोख्या युक्त्या; तात्काळ समजेल फळाच्या आतमधील परिस्थितीबाबत, जाणून घ्या

2013 च्या पोलीस उपनिरीक्षक अहर्ता परिक्षेतील 619 अंमलदारांना PSI पदी बढती