Corona Steroid : कोरोना उपचारात विनाकारण स्टेरॉईड देण्याचे भयंकर परिणाम, तज्ज्ञांनी केलं सावध, जाणून घ्या

नवी दिल्ली : सध्या संपूर्ण देश कोरोना संसर्गाच्या दुसर्‍या लाटेला तोंड देत आहे. अनेक राज्यांच्या रिकव्हरी रेटमध्ये सुधारणा झाली आहे, परंतु अजूनही रोज हजारो लोकांचा मृत्यू होत आहे. या दरम्यान मेयो क्लिनिकचे एमडी विन्सेंट राजकुमार यांनी उपचारात वापरल्या जात असलेल्या स्टेरॉईडबाबत सावध केले आहे. आपल्या ट्विटर हँडलवर ते सतत स्टेरॉईडच्या वापराची माहिती देत आहेत.

विन्सेट राजकुमार यांनी आपल्या एका पोस्टमध्ये लिहिले आहे की, भारतात अनेक संक्रमित तरूणांचा सुद्धा मृत्यू होत आहे ज्यांची सहजपणे रिकव्हरी झाली पाहिजे. मी भारतीय डॉक्टरांना ही विनंती करतो की, उपचारात स्टेरॉईडचा वापर कमी करा. स्टेरॉईड केवळ हायपोक्सिक रूग्णांसाठी लाभदायक आहे. हे सुरुवातीच्या स्टेजमध्ये देणे धोकादायक ठरू शकते.

आपल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिेले, संसर्गाच्या पहिल्या आठवड्यात व्हायरस शरीरात विभाजित होत असतो. अशावेळी स्टेरॉईडच्या वापराने रुग्णाच्या इम्युन सिस्टमवर दबाव वाढतो आणि व्हायरस जास्त वेगाने शरीरात पसरतो. स्टेरॉयड हे अँटीवायरल ड्रग नाही. रिकव्हरी दरम्यान अशा लोकांचा मृत्यू जास्त दिसून आला आहे, जे हायपोक्सिक नव्हते.

विन्सेंट राजकुमार यांनी लिहिले आहे की, कोरोना संक्रमितांमध्ये हायपोक्सिया रुग्णांच्या फुफ्फुसात इन्फेक्शन होण्याचा संकेत देते. सुरुवातीच्या स्टेजमध्ये शरीराची इम्युन सिस्टम यामुळे होणारी हानी नियंत्रित करू शकते. केवळ हायपोक्सियामध्येच एखाद्या रूग्णाला कमी मात्रेत स्टेरॉईडचे डोस दिले जाऊ शकतात. रिकव्हरी पीरियडमध्ये जास्तीत जास्त 5 दिवसांपर्यंत डेक्सामॅथासोन 6 एमजी रूग्णाला दिले जाऊ शकते.

स्टेरॉईडबाबत काय म्हणतात डॉ. विन्सेंट राजकुमार…
* स्टेरॉईडचे हाय डोस किंवा मोठ्या कालावधीपर्यंत सुरू ठेवल्यास शरीरात अनेक दुसर्‍या इन्फेक्शनचा धोका वाढतो.
* हे म्यूकर, औषधविरोधी फंगल इन्फेक्शन आणि औषधविरोधी बॅक्टेरियाचा धोका सुद्धा वाढवते.
* मांसपेशी कमजोर पडू शकतात आणि ब्लड शुगर अनियंत्रित होऊ शकते.
* डायबिटीजच्या रूग्णांसाठी हे अतिशय धोकादायक ठरू शकते.
* स्टेरॉईडचा वापर आवश्यकता पडली तरच करावा.
* मी माझे करियर डेक्सामेथासोनवरच केले आहे. याचा कमी डोस एखाद्या मनुष्याचा जीव वाचवू शकतो, परंतु ही दुधारी तलवार आहे.