‘या’ 2 गोष्टींपासून कोरोना व्हायरसचा दुप्पट ‘धोका’, तात्काळ दूर करा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : कोरोना विषाणूचा आतापर्यंत जगभरातील ४ लाखाहून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे. दरम्यान, रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्रे (सीडीसी) यांनी स्पष्ट केले आहे की, बियर्ड (दाढी) ठेवणाऱ्या लोकांना या विषाणूचा धोका जास्त आहे. सीडीसी असे का म्हणत आहे, जाणून घेऊया.

सीडीसीच्या म्हणण्यानुसार कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी स्वच्छतेची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. बाहेर पडताना तोंडाला मास्क लावावा आणि कोणत्याही वस्तूला स्पर्श होताच हात धुवावेत. आजकाल लोकांमध्ये बिअर ठेवण्याची क्रेझ आहे. परंतु आपणास ठाऊक असायला हवे की तुमचा स्टायलिश बियर्ड लुक तुमचे आयुष्य धोक्यात आणू शकतो.

सीडीसीच्या म्हणण्यानुसार, तोंडाला लावण्यात येणारे फेस मास्क दाढीच्या केसांमुळे चेहऱ्यावर व्यवस्थित बसत नाही. याकडे दुर्लक्ष केल्यामुळे एखादी व्यक्ती कोरोना विषाणूच्या संपर्कात येऊ शकते. सीडीसीने प्रसिद्ध केलेल्या या फोटोत सांगण्यात आले आहे की अखेर दाढीची कोणती शैली मनुष्यासाठी धोकादायक ठरू शकते. क्लीन शेव व्यतिरिक्त फक्त मिशा ठेवल्याने चेहऱ्यावर मास्क अधिक फिट बसतो.

तसेच न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीच्या लॅंगोन मेडिकल सेंटरमधील अ‍ॅलर्जी आणि संसर्गजन्य विशेषज्ञ पूर्वी पारिख यांनी काही काळापूर्वी सांगितले होते की मानवी नखे त्याच्यासाठी किती धोकादायक ठरू शकतात. पूर्वी पारीख म्हणतात की काही लोक त्यांच्या वाईट सवयीमुळे कोरोना विषाणूला आमंत्रण देत असतात. असे म्हणून पूर्वी यांनी अशा लोकांकडे इशारा केला ज्यांना दातांनी नखे कुरतडण्याची सवय आहे.

पूर्वीने सांगितले होते की, ‘आपल्या नखांमध्ये अगदी सहजपणे बॅक्टेरियाचा विषाणू, घाण किंवा कचरा गोळा होतो. जेव्हा कोणी आपले दात चावतो तेव्हा या सर्व गोष्टी शरीरात सहजपणे जातात. त्यामुळे लॉकडाउनच्या दरम्यान कोरोना विषाणूसंदर्भात विशेष काळजी घेण्याचा प्रयत्न करा. अस्वच्छतेबाबत अजिबात तडजोड करू नका. दाढी किंवा नखे नीट स्वच्छ करा जेणेकरून त्यामुळे आपल्या आयुष्यास कोणताही धोका उद्भवणार नाहीत.