Coronavirus : 5 दिवसात ‘ही’ लक्षणं दिसली तर तात्काळ करा ‘कोरोना’ टेस्ट, अन्यथा…

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या जगासह भारतात देखील दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या आजाराची तपासणी करण्यासाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. अनेक कोरोनाचे रुग्ण पळून जाण्याचे धक्कादायक प्रकार देखील घडले आहेत. या आजारापासून स्वत:ला लांब ठेवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला या आजाराच्या लक्षणांबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. नुकतेच यावर एक संशोधन करण्यात आले असून त्यानुसार सर्दी, खोकला या व्यतिरिक्त अन्य काही लक्षणं अशी आहेत जी संक्रमित व्यक्तीमध्ये दिसून येतात.

अमेरिकेतील संशोधनाद्वारे चीनमधील वुहान शहरातील जवळपास 50 ठिकाणी सॅपंलिंगच्या आधारावर रिसर्च करण्यात आले होते. विशेषज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोरोना पीडित व्यक्तीला 14 दिवसांसाठी निरिक्षणाखाली ठेवण्यात यावे. या संशोधनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार या आजाराच्या जाळ्यात अडकत असलेल्या व्यक्तीला पाच दिवसआधी सुका खोकला येत असतो. त्यानंतर ताप येण्यास सुरुवात होते.

श्वास घेण्यास त्रास होतो. सर्वसामान्यपणे तापाची लक्षणं आणि थकवा जाणवतो. जर ही लक्षण तुमच्यामध्ये दिसत असतील तर वेळ न घालवता लगेच डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करणं गरजेचं आहे. कारण तपासणी करण्यास उशीर केल्यास कोरोना डिटेक्ट व्हायला वेळ लागू शकतो. त्यामुळे तुमच्या नातेवाईकांना देखील कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे.

तपासणीसाठी हेल्पलाईन नंबर
हेल्पलाईन क्रमांकावर तुम्ही कॉल केल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यावेळी तुम्ही परदेशात प्रवास करुन आलात का किंवा परदेशातून आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आला होता का असे प्रश्न विचारले जातील. त्यानंतर तुम्हाला सेवा पुरवली जाईल हा नंबर प्रत्येक राज्याप्रमाणे वेगळा असतो. तसेच कोरोना व्हायरची टेस्ट तुम्हाला मोफत करुन देण्यात येईल. 020-26127394 या क्रमांकावर संपर्क साधून तुम्ही कोरोनाची तपासणी करुन घेऊ शकता.