Coronavirus : पिंपरी-चिंचवड पोलीस दलात ‘कोरोना’चा तिसरा बळी !

पिंपरी चिंचवड : पोलीसनामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्यातील (Pimpri Chinchwad Police Station) पोलीस नाईक रमेश लोहकरे (37) (Ramesh Lokare) यांचं शुक्रवारी कोरोनामुळं (Covid-19) निधन झालं आहे. कोरोनामुळं गेलेला पिंपरी चिंचवड पोलीस दलातील हा तिसरा बळी आहे.

लोहकरे यांना आधी श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. जेव्हा त्यांची तपासणी केली तेव्हा कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. चिंचवडमधील खासगी रुग्णालयात (Private hospital) त्यांच्यावर उपचार सुरू होते. शुक्रवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

पत्नी आणि मुलीसह चिंबळी येथे लोहकरे वास्तव्य करत होते. शांत आणि मनमिळावू स्वभाव असलेले म्हणून ते प्रसिद्ध होते. लोहकरे यांच्या निधनानंतर आता चिंचवड पोलीस ठाणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस दलातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

You might also like