Coronavirus : ‘कोरोना’ची लागण झाल्यास सर्वप्रथम दिसतात ‘ही’ 3 लक्षणं ! असं तपासा, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन – कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढून 300 झाली आहे. या जीवघेण्या व्हायरसच्या जाळ्यात येणाऱ्या लोकांचा आकडा पूर्ण जगात दोन लाखाच्या पलीकडे गेला आहे. अलीकडेच आलेल्या एका रिपोर्टमध्ये कोरोना व्हायरसची लक्षणे समजण्यासाठी ५ दिवस खूप असल्याचे सांगितले जात आहे. ५ दिवसातच शरीरात ही ३ लक्षणे ओळखून तुम्ही या व्हायरसचा धोका समजू शकता.

जर्नल ऍनल ऑफ इंटरनल मेडिसिनच्या एका रिपोर्टनुसार, कोरोना व्हायरसचे हे तीन लक्षण पहिल्या पाच दिवसात समोर येतात. जाणून घ्या काय आहेत ती ३ लक्षणे

१. अमेरिका संशोधकांकडून सादर केलेल्या या रिपोर्टमध्ये सांगितले गेले आहे की, कोरोना व्हायरसची लागण झाल्यावर पहिल्या ५ दिवसात व्यक्तीला कोरडा खोकला यायला सुरुवात होते.

२. रुग्णाला खूप ताप येऊ लागतो आणि त्याच्या शरीराचे तापमान खूप जास्त वाढते. आतापर्यंत अनेक आरोग्य तज्ञांनी कोरोना व्हायरसमध्ये खूप ताप येण्याचा दावा केला आहे.

३. कोरोना व्हायरसचा शिकार झाल्यावर पहिले ५ दिवसात व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होतो. एका अहवालात दावा केला गेला आहे की, श्वास घ्यायची समस्या फुफ्फुसात श्लेषा पसरण्यामुळे होते.

तर एकीकडे नॅशनल हेल्थ सेंटर (एनएचएस) आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननेही कोरोनामध्ये हेच लक्षण असल्याचा दावा केला आहे. यात अंगदुखी आणि सर्दी यासारखीही लक्षणे दिसत असल्याचे सांगितले गेले आहे. संशोधकांनी हा रिसर्च चीनच्या वुहान शहराच्या तब्बल ५० भागात केला असून आरोग्य तज्ञांनी यादरम्यान लोकांना १४ दिवस सेल्फ आयजोलेटेड राहण्याचा सल्ला दिला आहे.

अहवालात हेही सांगितले गेले आहे की, कोरोनाची लक्षणं सामान्य सर्दी-खोकला, फ्लू, इन्फेक्शन किंवा न्यूमोनियासारखी आहेत.