Coronavirus : बारामतीतील ‘त्या’ कोरोनाबाधिताच्या कुटुंबातील आणखी दोघांचा रिपोर्ट ‘पॉझिटिव्ह’

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात पुणे आणि मुंबईमध्ये कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे आणि परिसरात कोरनाने शिरकाव केला असून बारामतीमध्ये सापडलेल्या दुसऱ्या रुग्णाच्या कुटुंबातील दोघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

रुग्णाच्या संपर्कातील 16 जणांना तपासणीसाठी नायडू रुग्णालयात हालवण्यात आले होते. त्यापैकी 12 जणांचे अहवाल मिळाले असून त्यामध्ये दोघांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी याबाबत माहिती दिली. सोमवारी (दि.6) समर्थ नगरमध्ये सापडलेल्या कोरोना संक्रमित रुग्णाच्या हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये बारा व्यक्तींची तपासणी करण्यात आली.

तपासणी करण्यात आलेल्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णाची सून व मुलगा या दोघांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे बारामतीकरांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. लॉकडाऊन दरम्यान कोणत्याही परिस्थितीत घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रांताधिकारी कांबळे यांनी केले आहे.

महाराष्ट्रातील सद्य स्थिती
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वाधिक महाराष्ट्रात झाला आहे. पुण्यात कोरोनाबाधित असलेल्या 3 जणांचा मंगळवारी सकाळी 9 ते 11 या वेळेत मृत्यू झाला. तर मुंबईत आज आणखी 10 नवीन रुग्ण आढळून आले. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 891 वर पोहचला आहे. राज्यात आज सकाळपर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा 23 ने वाढला.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like