Coronavirus In Pune : शहरातील ‘कोरोना’ कंट्रोलमध्ये पण जिल्हयातील गंभीर – विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप आटोक्यात आलेला नाही. त्यामुळे या दोन ठिकाणी आपण विशेष लक्ष देत असून या दोन्ही ठिकाणी आपण टेस्टिंग, स्क्रिनिंगचे प्रमाण वाढवत आहोत. तर पुणे महापालिकेच्या क्षेत्रात कोरोना बाधित रुग्णंची संख्या हळूहळू कमी होत असून ही दिलासायक बाब असल्याचे, विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले.
सौरभ राव यांनी सांगितले की, गेल्या 50 दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील टेस्टिंगचे प्रमाण राज्यात नाही तर देशात सर्वात जास्त आहे. याचे कौतुक केंद्र शासनाने देखील केले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामीण भागामध्ये 50 हजार ॲन्टिजेन किट घेण्यात येणार आहे. 50 टक्के टेस्टिंग आरटीपीस तर 50 टक्के ॲन्टिजेनद्वारे रुग्णांची टेस्टिंग करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सौरभ राव पुढे म्हणाले, पुणे जिल्ह्याची कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेता महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेतून रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत. आतापर्यंत144 रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी झाल्याची माहिती राव यांनी दिली.

तसेच कोणीही घाबरून जाऊ नये, ज्यांना प्लाझ्मा हवा असेल तर तातडीने प्लाझ्मा उपलब्ध करून देण्याच्या सूचना महापालिका आणि ग्रामीण भागातील रुग्णांलयांना त्यांनी यावेळी दिल्या. तर कंपन्यांना नोटीस पाठवणार ग्रामीण भागात असलेल्या कंपन्या कोरोनाबाबत दक्षता घेत नसतील तर अशा कंपन्यांना नोटीस पाठवली जाईल. लोकप्रतिनिधींनी केलेल्या तक्रारीबाबत बोलताना त्यांनी सांगितले. विशेषत: चाकण परिसरात असलेल्या कंपन्यांमध्ये कोरोनाबाबत दक्षता घेत नसल्याची तक्रार आमदारांनी केली होती. या कंपन्यांना नोटीस पाठवून कठोर कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी यावेळी कंपन्यांना दिला.