Unlock-4 मध्ये शाळा-कॉलेज उघडणार का ? आरोग्य मंत्रालयाने दिले ‘हे’ उत्तर, जाणून घ्या

नवी दिल्ली : एक सप्टेंबरपासून देशात अनलॉक 4 ची सुरूवात होत आहे. यावेळी सर्वांचे लक्ष शाळा आणि कॉलेजबाबत सरकारच्या निर्णयाकडे आहे. गृह मंत्रालयाकडून जारी होणार्‍या गाईड लाइन्सपूर्वी आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, सरकारकडून शाळा आणि कॉलेज उघडण्याबाबत कोणतेही निर्देश नाहीत. आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी म्हटले की, अनलॉकबाबत गृह मंत्रालयाने जारी केलेल्या गाईड लाइन्समध्ये शाळा आणि कॉलेज उघडण्याबाबत कोणतेही निर्देश नाहीत.

राजेश भूषण म्हणाले, देशात जे काही उघडले जात आहे, त्यासाठी आरोग्य मंत्रालय एसओपी जारी करते. अजूनही शाळा आणि कॉलेज उघडण्याचा निर्णय झाला तर तो एसओपीच्या अंतर्गत येईल आणि तो लागू केला जाईल.

3 कोटीपेक्षा जास्त टेस्ट केल्या
देशातील कोरोनाच्या स्थितीबाबत आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषद घेतली. यावेळी सांगण्यात आले की, देशात आतापर्यंत 3 कोटी 60 लाखांपेक्षा जास्त टेस्ट करण्यात आल्या आहेत. आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले, देशात बरे झालेल्या रूग्णांची संख्या अ‍ॅक्टिव्ह केसपेक्षा तीनपट जास्त आहे. देशात लॅबच्या संख्येत सुद्धा वाढ झाली आहे. यामध्ये प्रायव्हेट आणि सरकारी लॅब दोन्ही आहेत. ज्यामुळे टेस्टींग वाढल्या आहेत.

मंत्रालयाकडून सांगण्यात आले की, एकुण प्रकरणांच्या 22.2 टक्के केस अ‍ॅक्टिव्ह आहेत. रिकव्हरी रेट 75 टक्केपेक्षा जास्त झाला आहे. देशात कोरोनाचा मृत्युदर 1.58 टक्के आहे. जो जगातील सर्वात कमी दरांपैकी एक आहे. मागील 24 तासात अ‍ॅक्टिव्ह केसच्या संख्येत 6,400 ची घसरण नोंद झाली आहे. हे प्रथमच झाले आहे.

आयसीएमआरचे महासंचालक प्रोफेसर डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितले की, भारतात कोरोनाच्या तीन वॅक्सीनची टेस्ट सुरू आहे. सीरम इन्स्टीट्यूटच्या वॅक्सीनची 2 (बी) फेज आणि 3 फेज टेस्ट सुरू आहे. भारत बायोटेक आणि जेडस कॅडिलाच्या वॅक्सीनने 1 फेजची टेस्ट पूर्ण केली आहे.