Coronavirus : ‘कोरोना’च्या रुग्ण संख्येत अमेरिकेनं चीनला टाकलं मागे, जगभरात 5 लाख लोक ‘संक्रमित’

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन –कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे आता अमेरिकेने चीनलाही मागे टाकले असून जगभरात कोरोनाबाधितांची संख्या ५ लाखांहून अधिक झाली आहे. जगात सध्या दर ५ तासात १० हजार बाधितांची भर पडत आहे. अमेरिकेत कोरोना बाधितांची संख्या ८२ हजार ४०४ वर पोहचली आहे. ही संख्या गुरुवारी सायंकाळची आहे. जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या सेंटर फॉर सिस्टम साइंट अँड इंजिनियरिंग ने जाहीर केले आहेत. त्याच वेळी चीनमध्ये ८२ हजार ३४ कोरोना बाधितांची संख्या होती.

एकट्या न्यूयॉर्कमध्ये तब्बल ३७ हजार ८०२ केसेस समोर आल्या आहेत. हे शहर कोरोना बाधितांचे केंद्रबिंदू बनले आहे. न्यू जर्सीमध्ये ६ हजार ८७६, कॅलिफोर्निया ३ हजार ८०२ लोक कोरोना बाधित झाले आहेत. अमेरिकेतील कोरोना विषाणूचा पहिला मृत्यु वॉशिग्टंगमध्ये झाला होता. तेथे २ हजार ५८८ जणांना कोरोनाची बाधा झाली असून आतापर्यंत १३० जणांचा मृत्यु झाला आहे.

जगभरात कोरोना विषाणूचे ५ लाख २६ हजार ४४ लोक शिकार झाले आहेत. आतापर्यंत २३ हजार ७०९ जणांचा मृत्यु झाला आहे.  अमेरिकेत कोरोना बाधितांची संख्या अधिक झाली असून तब्बल १ हजार १७८ जणांचा मृत्यु झाला आहे. त्यात न्यूयॉर्क २८१, किंग काऊंटी १०० जणांचा मृत्यु झाला होता.
अमेरिकेचे सुरक्षा मंत्री मार्क एस्पर यांनी कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी परदेशातील अमेरिकन सेना आणि सिव्हिल सुरक्षा कर्मचारी यांच्या कामकाजावर ६० दिवस बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जगभरातील ९० हजार अमेरिकन सैन्यांची पुढील दोन महिने कामे थांबविण्यात आली आहे