Coronavirus : मालेगावात ‘कोरोना’चं थैमान सुरूच, 110 पॉझिटिव्ह ‘रुग्ण’

मुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : देशात कोरोनाचा कहर सुरुच आहे, त्यात सर्वाधिक आकडे राज्यातून समोर येत आहेत. नाशिक जिल्ह्यातील मालेगावातही कोरोना बाधितांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होत आहे. आज दिवसभरात 14 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून त्यात 6 पुरुष तर 3 महिलांचा सामावेश आहे. यासह मालेगावात कोरोना रुग्णांची संख्या 110 वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात सामान्य रुग्णलायतील सहाय्यक वैद्यकीय अधिकारी योगेश पाटील यांनी दिली.

मालेगाव बनलं कोरोना ‘हॉटस्पॉट’ :

कोरोनाबाधित रुग्णांनी शंभरी गाठली असल्याने मालेगाव कोरोनाचा हॉटस्पॉट बनले आहे. नागरिकांमध्ये भीती वातावरण असले तरीही कोणीच ही बाब गांभीर्याने घेण्यात तयार नाही. दररोज नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडत असल्याने प्रशासनही हतबल झाले आहे. आजीमाजी लोकप्रतिनिधीनी जनतेला वाऱ्यावर सोडत किरकोळ कारणावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात गुंतले आहेत. अश्या परिस्थिती वेळीच कठोर पावलं उचलली गेली नाहीत तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, शहरात लॉकडाऊनचं उल्लंघन केलं जात असल्यानं एकूण 400 जणांची पथके तैनात करण्यात आली आहेत.