लॉकडाऊन आणखी वाढवणार ? लवकरच निर्णय, महापौर म्हणाले – ‘जान है तो जहान है’

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्यात पुणे, मुंबई, औरंगाबाद, सोलापूर या शहरांमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. राज्यातील इतर शहरांमध्ये देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. नाशिक शहरात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर शहर आणखी 10 दिवस लॉकडाऊन करावं, अशी मागणी महापौर सतीश कुलकर्णी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

महापौर म्हणाले, शरातील परिस्थिती गंभीर आहे. परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर काही होऊ शकत नाही. आम्ही लॉकडाऊनचा निर्णय घेऊ शकतो. पण शासनाशी विचार विनिमय झाल्यास योग्य होईल. जान है तो जहान है. नागरिक वाचलेच नाहीत तर अर्थकारणाला काय करायचे,असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. निमय पाळावेत असे आवाहन त्यांनी नाशिककरांना केले आहे . शहर लॉकडाऊन करण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असंही महापौर सतीश कुलकर्णी यांनी सांगितले आहे.

दरम्यान, फिजिकल डिस्टन्सिंगसह सभेचा फज्जा उडाल्यानं नाशिक महापालिकेत अभूतपूर्व गोंधळ पहायला मिळाल. महासभेत हमरीतुमरी झाली. सत्ताधारी भाजपबरोबर सेना व राष्ट्रवादीची भूमिका संशायास्पद असल्याचं दिसून आलं या गोंधळात मात्र सोळा कोटींचे वादग्रस्त विषय मंजूर करण्यात आले.