Corona Virus : ‘कोरोना’ व्हायरसवरील औषध भेटलं वाटतं ? चीनमध्ये तंदुरूस्त झाले 10 हजारहून अधिक ‘रूग्ण’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनमध्ये कोरोना व्हायरसने आतापर्यंत 1700 रुग्णांचा जीव घेतला आहे. चीन या व्हायरसवर उपचार शोधत आहे परंतु या दरम्यान चीनमधून चांगली बातमी येत आहे की कोरोना व्हायरसने पीडित असलेले जवळपास 10 हजार 844 रुग्णांवर यशस्वी उपचार झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे.

चीनच्या वृत्तसंस्थानुसार, तेथील राष्ट्रीय आरोग्य आयोगाने आपल्या अहवालात सांगितले की, कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये आतापर्यंत 1770 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर उपचारानंतर 1425 रुग्णांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. आतापर्यंत देशात एकूण 70 हजार 548 कोरोना व्हायरसने पीडित लोक आढळले आहेत.

वृत्तानुसार आपल्या एका अहवालात सांगितले की, चीनमध्ये रविवारी या जीवघेण्या व्हायरसचे 105 रुग्ण आढळले आहेत तर 2 हजारपेक्षा जास्त रुग्ण संक्रमित आढळले आहेत. हुबेईमध्ये कोरोना व्हायरसचे अधिक रुग्ण आढळले आहेत. हा व्हायरस पसरल्याचे कारण चीनमधील केंद्र सरकार मानले जात आहे. चीनच्या या प्रांतात मागील रविवारी 100 लोकांचा मृत्यू झाला.

या जीवघेण्या व्हायरसने पूर्ण जगात आतापर्यंत 1800 पेक्षा जास्त लोकांचा जीव घेतला आहे. ज्यातील आधिकतर चीनमधील आहेत. फिलिपीन्स, जपान आणि तैवानमध्ये देखील 1 – 1 रुग्ण आढळले आहेत.

You might also like