PM मोदींच्या मतदारसंघात लसीची वाहतूक करताना जे घडल ते पाहून डोक्यावर हात माराल !

पोलीसनामा ऑनलाईन – देशात कोरोना लसीकरणाला दि. 16 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. त्यासाठी सीरम इन्स्टिट्यूटने पुण्यात तयार केलेली कोविशील्ड लस देशातल्या अनेक राज्यांमध्ये पाठवली आहे. लसीची (corona virus vaccine ) वाहतूक करताना काळजी घेणे अत्यंत गरजचे असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत धक्कादायक प्रकार घडला आहे. कोरोना लसीची (corona virus vaccine ) वाहतूक करणाऱ्या वाहनाच फिटनेस 2016 मध्येच संपल्याची धक्कादायक माहिती आटीओच्या संकेतस्थळावरून समोर आली आहे. यापूर्वीही लसीकरणाचे ड्राय रन च्या वेळी वाराणसीत लसीच्या वाहतुकीदरम्यान निष्काळजीपणा दिसून आला होता.

पंतप्रधान मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत बुधवारी दुपारी कोरोना लसीची पहिली बॅच पोहोचली. ही बॅच विस्तारा एअरलाईन्सच्या माध्यमातून वाराणसीत आणली गेली. विस्तारा एअरलाईन्सने कोरोना लसीचे 16 खोके वाराणसीत पोहोचले. यामध्ये 14 जिल्ह्यांसाठी 1 लाख 85 हजार डोस आहेत. मात्र कोरोना लसी पोहोचवत असताना मोठा हलगर्जीपणा होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. लसीची वाहतूक करणारे UP 65 AG 0021 क्रमांक असलेले वाहन साडे सोळा वर्षे जुने आहे. वाहनाच फिटनेस 2006 मध्येच संपल्याचे समोर आले आहे.

वाहनाची फिटनेसची वैधता 12 मे 2006 पर्यंत होती. त्यामुळे फिटनेसची वैधता आता जवळपास साडे पंधरा वर्षे उलटली आहेत. कोरोना लसींची वाहतूक करणारी वाहने सुस्थितीत असणे अत्यंत गरजेचे आहे. कोरोना लसी विशिष्ट तापमानात ठेवाव्या लागतात. त्यामुळे त्यांची वाहतूक करणारी वाहन खराब झाल्यास त्याचा थेट परिणाम लसीवर होऊ शकतो. कोरोना लसी कमीतकमी वेळेत आरोग्य केंद्रात पोहोचणे आवश्यक असते. त्यामुळे लसींच्या वाहतुकीसाठी वापरली जाणारी वाहन चांगल्या स्थितीत असायला हवीत.