तुमच्या इम्यूनलाही शरीराचा शत्रू बनवू शकतो सायटोकाईन स्टॉर्म; जाणून घ्या हा आजार आहे तरी काय?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णसंख्येतही वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्ययंत्रणांवर याचा मोठा ताण येत आहे. त्यातच आता सायटोकाइन स्टॉर्म या नव्या आजाराचा धोका वाढत आहे. सध्या सायटोकाईन स्टॉर्ममुळेही अनेक कोरोनाबाधितांचा मृत्यू होऊ शकतो.

सायटोकाईन स्टॉर्म म्हणजे जेव्हा कोरोनाबाधित रुग्णाच्या शरीरातील अवयव काम करणे बंद करतात. त्यानंतर रुग्णाचा मृत्यू होतो. त्याच अवस्थेला मेडिकल सायन्समध्ये सायटोकाईन स्टॉर्म म्हटले जाते.

शरीरावर किती परिणाम करतो सायटोकाईन स्टॉर्म?

सायटोकाईनचा वाढल्याने ह्रदयाचे ठोके अनियंत्रित होऊ शकतात. रुग्णांना ह्रदयविकाराचा धोकाही असतो. जेव्हा शरीरात संक्रमित करणारा व्हायरस इम्यून सिस्टिमवर अशाप्रकारे हल्ला करतो तेव्हा अनियंत्रितपणे सायटोकाईन तयार होऊ लागतो. मोठ्या प्रमाणात तयार झालेला सायटोकाईन पेशींवर हल्ला करतो. त्यामुळे शरीरावर दुष्परिणाम करतो आणि अवयव काम करणे बंद होते. अशाप्रकारे इम्यून सिस्टिमच शरीराचा शत्रू बनतो. सायटोकाईन हा थेट फुफ्फुसावर हल्ला करतो. त्यामुळे शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होण्यास सुरुवात होते.

ऑक्सिजनची मात्रा कमी होत असेल तर…

सायटोकाईनमुळे शरीरातील धमन्या फुगतात. त्यामुळे ह्रदयविकाराचा झटका येतो. नसांमध्ये रक्त जमा होणे थ्रोम्बोसिसही असू शकतो. कोरोनाबाधित रुग्णाच्या शरीरात अशाप्रकारे संक्रमण दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता असते. त्यामध्ये रुग्णाला स्टेरॉईडही देणे गरजेचे असते. तसेच दुसऱ्या आठवड्यात रुग्णाला प्रकृतीकडे सातत्याने लक्ष देणे गरजेचे आहे. शरीरातील ऑक्सिजनची मात्रा कमी होत असेल तर त्वरीत डॉक्टरांना याची माहिती द्यायला हवी. सायटोकाईन स्टॉर्म जीवघेणा होऊ शकतो. कोरोनाबाधित अनेक रुग्णाच्या मृत्यूमागे हेही एक कारण असू शकते. अशा रुग्णाच्या शरीरात सायटोकाईन स्टॉर्म आढळल्यास रुग्णाची प्रकृती नाजूक होते.

कॅन्सरच्या उपचारादरम्यान ठरू शकतो जीवघेणा

Webmd च्या एका रिपोर्टनुसार, सायटोकाईन स्टॉर्मला ज्युवेनाईल आर्थरायटिससारखी ऑटोइम्यून डिसीजमध्ये डेव्हलप होण्यासाठी ओळखला जातो. फ्ल्यूसारखे इन्फेक्शनही शरीरात ट्रिगर करू शकतो. कॅन्सरच्या उपचारादरम्यान हा आजार जीवघेणा ठरू शकतो. शरीरातील अनेक सायटोकाईन सेल्स मृत्यूला ट्रिगर करते. जेव्हा तुमच्याकडे एका वेळी अशा अनेक पेशी असतात. त्यामुळे आम्हाला अनेक टिशू मरू शकतात. यातील सर्वाधिक टिशू आपल्या फुफ्फुसात असतात.