Coronavirus Impact : जमावबंदी दरम्यान कंपनीत 2000 कर्मचारी, पोलिसांनी केली कारवाई

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – जगात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसची दहशत आता भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसला रोखण्यासाठी सरकारकडून अनेक निर्णय घेतले जात आहेत. अनेक राज्य सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतला असून महाराष्ट्रातही जमावबंदी लागू केली आहे. राज्यात १४४ कलम लागू असतानाही नाशिकमधील डब्ल्यूएनएस कंपनीत २ हजार कर्मचारी काम करत असताना सरकारवाडा पोलिसांनी या बीपीओ आयटी कंपनीवर कारवाई केली आहे. तसेच साथ रोग नियंत्रण कायद्याअंतर्गत या कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कंपनीने या व्हायरसचा प्रसार थांबवण्यासाठी वर्क फ्रॉम होमची सुविधा सुरु करावी. कमी कर्मचाऱ्यांनी काम करावे, असे आवाहन सतत केले जात आहे. आता राज्य सरकारने जमावबंदीही लागू असून आता राज्यव्यापी कर्फ्यू लागू करत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली आहे.

देशातली रेल्वे सेवाही ३१ मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला असून राज्यातील एसटी सेवादेखील बंद करण्यात आली आहे. लोकं ऐकत नसल्यामुळे राज्यव्यापी कर्फ्यू लावण्यासाठी मजबूर असल्याचे उद्धव ठाकरेंनी सांगितले.