‘लॉकडाऊन’मध्ये बोर झाली अभिनेत्री उर्वशी रौतेला, शेअर केला ‘हॉट’ बिकीनीतील फोटो

पोलीसनामा ऑनलाइन टीम  – सध्या देशात लॉकडाऊन आहे. सर्व देश कोरोनाची लढाई लढण्यासाठी एकत्र उभा आहे. सर्व स्टार्स सध्या जरी घरात असले तरी ते आपल्या जुन्या दिवसांची आठवण काढताना दिसत आहेत. अभिनेत्री उर्वशी रौतेलानंही आपल्या जुन्या दिसवसांची आठवण काढत एक बिकीनीतला फोटो शअर केला आहे. हा फोटो तिच्या मालदीव ट्रीपमधील आहे.

या आधीही उर्वशीनं तिच्या मालदीवमधील ट्रीपचे फोटो शेअर केले होते. या फोटोत तिनं हॉट बिकीनी घातली होती ज्यात ती आपली किल्लर फिगर फ्लाँट करताना दिसली होती. उर्वशीचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. यानंतर पुन्हा तिनं शेअर केलेला बिकीनी फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.

उर्वशी कायमचं तिचे हॉट फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते ज्याला चाहत्यांचाही मोठा प्रतिसाद असतो. यावेळीही असंच काहीसं झालं आहे. फोटो शेअर करून 24 तासंही पूर्ण झाले नाहीत परंतु या फोटोला 1.4 मिलियन्स लाईक्स मिळाले आहेत.

उर्वशीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर काही दिवसांपूर्वी ती एक डायमंड दा हार लेदे यार या म्युझिक व्हिडीओत दिसली होती. असंही बोललं जात आहे की, ती कार्तिक आर्यनच्या भूलभूलैया या सिनमात दिसणार आहे. सनी देओलसोबत उर्वशीनं आपला बॉलिवूड डेब्यू केला होता. सिंह साहब दी ग्रेट असं तिच्या पहिल्या सिनेमाचं नाव होतं. याशिवाय तिनं अनेक म्युझिक व्हिडीओत काम केलं आहे. रॅपर हनी सिंगच्या लव डोस गाण्यातही ती दिसली आहे. भाग जानी, सनम रे अशा अनेक सिनेमात तिनं काम केलं आहे. 22 नोव्हेंबर 2019 रोजी रिलीज झालेल्या पागलपंती मल्टीस्टारर सिनेमातही तिनं काम केलं आहे.

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like