Corona News : नाही बेटा, मला माझं कर्तव्य पार पाडायचं आहे

भद्रावती : पोलीसनामा ऑनलाइन –    सद्ध्या संपुर्ण जगावर कोरोनाचे सावट असुन कोरोना योद्धे आपल्या जिवावर उदार होऊन आपले कर्तव्य बजावत आहे. याची प्रचिती नुकतीच पोलिस कर्मचार्यांचा ‘ नाही! बेटा मला माझे कर्तव्य पार पाडायचे आहे’ या वाक्यावरून जनतेला येत आहे.

कोरोना संकटात संपुर्ण जग न्हाऊन निघालेले असुन लहाना पासुन तर मोठ्या पर्यंत सर्वांना मृत्यु ची भीती वाटत आहे. हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे आपले वडील कर्तव्यावर गेल्यास त्यांना सुध्दा कोरोना होऊ शकतो. हे लहान मुलांना सुध्दा समजतं असल्यामुळे ते आपल्या वडिलाचे पाय धरून कर्तव्यावर किंवा बाहेर न जाण्यासाठी विनवणी करीत आहेत. यामध्ये विशेष करून पोलिस अधिकारी व कर्मचारी, रुग्णालयातील डाॅक्टर व परिचारिका, रूग्ण वाहिका चालक, तसेच इतर शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश आहे. पोलिस अधिकार्यांच्या बाबतीत जर विचार केला तर शासनाचा नियमांचे पालन करण्यासाठी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस विभागातील कर्मचार्यांना चोविस तास सेवा द्यावी लागते. लाॅकडाऊन च्या काळात आपल्या कुंटूंबापासुन दुर असलेल्या आणि ऐकटेच राहनार्या कर्मचार्यांना साधा चहा आणि नास्ता सुध्दा मिळत नव्हता. त्यामुळे त्यांची अवस्था कशी असेल याची आपण कल्पना करू शकतो. अनेक कर्मचार्यांनी सहा महिन्यापासून आपल्या कुटुंबाची भेट सुद्धा घेतली नाही.

तरी देखील नियमाचा भंग करणार्या एखाद्या इसमावर कारवाई केल्यास ईकडून तिकडून दबाव आणल्या जातो. ‘ये मेरा आदमी है’ ‘छोड दो’ असे वाक्य ऐकायला मिळतो. आणि त्यांचे ऐकले नाही तर त्या अधिकार्यांच्या विरोधात रान पेटवले जाते. त्याच्या विरोधात खोटी तक्रार वरिष्ठांकडे केली जाते. अशा वेळी त्या अधिकार्यांनी काय करायचं हा मोठा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे आपल्या मुलाबाळांचा व कुटुंबाचा विचार न करता अविरतपणे आपले कर्तव्य बजावत आहे. हेच खरे कोरोना योद्धे असुन जनतेंनी त्यांना सहकार्य करणे गरजेचे आहे.