Coronaviru : कर्तव्यनिष्ठेला सलाम ! 7 वर्षाच्या लेकीला घरात कुलूप बंद करून पती-पत्नीची ‘देशसेवा’

भीलवाडा : वृत्तसंस्था – देशात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून कोरोना विरुद्धच्या लढाईत अनेक योद्धे जीवाची पर्वा न करता कोरोना विरोधात लढा देत आहेत. आपण कुटुंबासोबत घरात सुरक्षित आहोत. मात्र, एक जोडपं घराबाहेर राहून देशाचं रक्षण करीत आहे. त्यांची कहाणी वाचल्यावर अंगावर कटा येईल.

सध्या राजस्थानमधील भीलवाडा मॉडेल देशात गाजत आहे. या भागातीलच ही घटना आहे. भीलवाड्यात तीन जणांचे कुटुंब राहते. या कटुंबातील तिघांचे कोरोनाच्या लढ्यात विशेष महत्त्व आहे. या परिवारातील पत्नी पोलिसात तर पती वैद्यकीय विभागात कार्यरत आहे. राजस्थानमधील सर्वात आधी कोरोनाचा हॉटस्पॉट झालेल्या भीलवाडा शहरात राहणाऱ्या या जोडप्याला 7 वर्षाची मुलगी आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत या दोघांचेही काम अती महत्त्वाचे आहे. हे दोघे दिवसभर घराबाहेर राहून देशसेवा करत असताना या लहानशा चिमुरडीला घराला कुलूप बंद करून ठेवतात. असे करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही.

पती-पत्नी कर्तव्यावर असतात
भीलवाड्याचे निवासी दिलखुश हे जिल्हा मुख्यालयातील महात्मा गांधी जिल्हा रुग्णालयात कंपाऊडर आहेत. दिलखूश यांची पत्नी सरोज राजस्थान पोलीस दलात कॉन्स्टेबल आहेत. कोरनाच्या संक्रमणामुळे 20 मार्च ते 3 एप्रिल पर्यंत कर्फ्यू लावण्यात आला आहे. यापुढे 13 एप्रिलपर्यंत हा कर्फ्यू असणार आहे. हे दोघे अशा ठिकाणी काम करतात कि त्यांना काम करण महत्त्वाच तर आहेच शिवाय त्यांना कामासाठी जास्त वेळ द्यावा लागतो.

इच्छा असूनही मदत करु शकत नाही
या दांपत्याची 7 वर्षाची मुलगी दीक्षिता तिसरीत शिकते. ही चिमुरडी मागील 10 दिवसांपासून घरात एकटी राहते. सध्या तिला सांभाळायला कुटुंबातील कोणतीही व्यक्ती येऊ शकत नाही. त्यामुळे पती-पत्नी आणि मुलगी आपआपल्या ठिकाणी एका वेगळ्याच संकटाला तोंड देत आहेत.

भीलवाडा येथील मीरा नगरमध्ये राहणारे दिलखूश रुग्णालयात 10 दिवस ड्यूटीवर होते. ते घरी आले तरी मुलीला भेटू शकत नाहीत. कारण सलग 10 दिवस आयसोलेशन वॉर्डमध्ये काम केल्यांनंतर त्यांना पुढील 10 दिवस आयसोलेशनमध्ये रहावे लगतेय. तर दीक्षिताची आई सरोज या देखील कर्फ्यूदरम्यान शहरात आपल्या टीमसोबत फिरून नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन करत आहे. ड्युटी संपवून त्या घरी आल्यानंतर 8 ते 9 तासच घरात थांबतात. यानंतर मुलगी दिक्षिता ही दिवसभर घरात एकटीच असते.