Corona Warriors : पुणे पोलिसांची ‘शॉर्टफिल्म’ एकदा पाहाच ! वाढवतेय पोलिसांसह पुणेकरांचं ‘मनोधैर्य’ (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे पोलीस अनेकविध कारणामुळे चर्चेत असतात. पण सध्या ते चर्चेत आहेत ते एका लघुपटामुळे. कारण हा लघुपट प्रत्येकाच्या मनाचा ठाव घेत आहे. कोरोनाच्या महामारीत कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांचे आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे मनोबल काय होत आहेत हे दाखविण्यात आले आहे. तसेच लढाई कोरोनाशी असून, कोरोना वॉरीअर यांच्याशी नसल्याचे देखील प्रभोधन करण्यात आले आहे.

राज्यात कोरोना वाढीतले प्रमुख शहर असणारे पुणे शहर. या पुण्याला वाचविण्यासाठी पालिका, जिल्हा आणि पोलीस प्रशासन आटोकाट प्रयत्न करत आहेत. पण अशावेळी रस्त्यावर उतरून काम करत आहेत, ते पुणे पोलीस. कर्तव्य बजावणाऱ्या शहरातील 52 पोलिसांना आता परियंत कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील दोन कर्मचाऱ्याना वीरमरण आले आहे. आपसूकच माध्यमातून येणाऱ्या बातम्या सध्याची परिस्थिती यामुळे प्रत्येकजनच भीतीच्या छायेत आहेत. मग अश्यावेळी प्रत्यक्षात काम करणाऱ्या पोलीसांच्या कुटुंबियाची मानसिकता काय होत असेल, हा विचार देखील घाबरूऊन टाकतो.

पण समज आणि गैरसमज जाणून घेणे आवश्यक असते. आणि त्यातही जनतेची आणि राज्याची व देशाचे संरक्षण करण्याची शपथ खाकी परिधान करताना घेतलेली हे आठवतात आणि आपले कर्तव्य पार पडण्याचे बळ मिळते. तेच या लघुपटामधून दाखविण्यात आले आहे.

तीनदिवस ड्युटीकरून घरी गेल्यानंतर आतुरतेने वाट पाहणारी पत्नी त्या कर्मचाऱ्याशी बोलत नाही. तो पुन्हा ड्युटीवर जायचे असल्याचे सांगत असतो. पण पत्नीचे डोळे पानवलेले असतात आणि कर्मचारी हे पाहून भावूक होऊन विचारतो. त्यावेळी पत्नी शेजारी राहणाऱ्या कर्मचाऱ्यास कोरोना झाला. त्यांना रुग्णवाहिका येऊन घेऊन गेली. कुटुंब खूप रडत होते. त्यांना कोणी बोलायला किंवा जवळ देखील गेले नाही, हे सांगत चिंतेने डोळ्यातुन अश्रू अनावर होतात. पण कर्मचारी पत्नीला धीर देऊन मी संरक्षण करण्याची शपथ घेतली आहे. आणि कोरोनाने काही होत नाही. सर्वजण बरे होऊन घरी देखील आले आहेत. उलट आपण त्यांना जाऊन भेटुयात. भीती कोरोनाची आहे. कोरोना झालेल्यांशी नाही. त्यामुळेच लढाई आजाराशी आहे. आजाराशी लढणाऱ्या वॉरिअर यांच्याशी नसल्याचे दखविण्यात आले आहे. त्यामुळे या लघुपटानंतर सर्वच पोलीस कुटुंबीय आणि इतरांना देखील लढण्याचे बळ मिळत असणार.

पुणे पोलिसांचा लघुपट घराघरात प्रबोधन तर करत आहेच पण प्रत्येकाला या कोरोनाशी दोन हात करण्याचे बळही देत आहे. तर पुणे पोलीस लघुपट, छायाचित्रे आणि छोटछोट्या फिल्ममधून परोबधन करत आहेत.