Corona Wave : कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी चीनकडे गुप्त औषध आहे का? ‘या’ कारणामुळं बळावला संशय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगातील जवळपास सर्व देशांना विश्वास आहे की कोरोना (Corona Wave) व्हायरस हे चीनचे कारस्थान आहे. आता कोरोनाच्या वेगवेगळ्या लाटांची शक्यता वर्तवली जात असताना चीन एकदम बिनधास्त आहे कारण तो निश्चिंत यासाठी आहे की त्याने एखादे औषध शोधून काढले असावे. परदेशी मीडियात वारंवार असे म्हटले जात आहे की, अखेर चीनने असे काय केले आहे की तो महामारी नियंत्रित करण्यात यशस्वी झाला आहे. कदाचित बाहेरच्या जगाला वाटते की चीनने एखाद्या प्रकारचे गुप्त औषध किंवा व्हॅक्सीन इत्यादीचा वापर करून स्वताला वाचवले आहे. Corona Wave | does china have a secret medicine to control corona hence the question raised

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

कोरोना व्हायरसवर चीनकडे गुप्त औषध आहे का
दरम्यान वारंवार चीनमधून व्हायरस लीक होण्याबाबत किंवा वुहान व्हायरसबाबत सुद्धा चर्चा केली जात आहे. इतकेच नव्हे तर अमेरिकेसारखे देश डब्ल्यूएचओच्या (WHO) रिपोर्टवर प्रश्न उपस्थित करण्याचा अंदाज मीडिया व्यक्त करत आहे.

परंतु चीनमध्ये राहणार्‍यांना माहित आहे की, मागच्या वर्षी येथे किती सक्तीने नियमांचे पालन केले गेले, जे अजूनही जारी आहे. परंतु परदेशांमध्ये सरकारे आणि लोकांनी व्हायरसला इतक्या गांभिर्याने घेतले नाही. याच कारणामुळे महामारी वारंवार स्थिती बिघडवत आहे.

अनेक देश दुसर्‍या आणि तिसर्‍या लाटेला बळी पडले
अनेक देश महामारीच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या लाटेचा सामना करत आहेत, तर चीनने आपल्या देशात दुसर्‍या लाटेला येऊच दिले नाही. यासाठी कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

राजधानी पेइचिंगमध्ये अनेक महिन्यांपासून परदेशातून कोणतेही थेट आंतरराष्ट्रीय विमान आलेले नाही. तर महामारीचा प्रकोप सुरू असताना भारतात काही कालावधीपर्यंत दिल्ली, मुंबई इत्यादी शहरात लंडन, न्यूयॉर्क, डरबनहून एयर बबल द्वारे सातत्याने विमान सेवा मोदी सरकारने (Modi government) सुरू ठेवली होती.

चीनच्या सर्व शहरात महामारी नियंत्रित
येथील सर्व शहरात महामारी नियंत्रणाखाली आहे. लोक मास्क घालूनच घराबाहेर पडत आहेत. बाहेर पडल्यावर सुद्धा काटेकोरपणे नियमांचे पालन केले जात आहे.

चीनमध्ये क्वारंटाईनच्या नियमात शिथिलता नाही
परदेशातून भारतात आलेल्या प्रवाशांना कठोर क्वारंटाइनचा नियम नव्हता.
परंतु चीनमध्ये परदेशातून आलेल्या प्रत्येक व्यक्तीला दोन आठवडे हॉटेलमध्ये विलगिकरणात राहणे बंधनकारक आहे.

या दरम्याना त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर क्वारंटाइनचा कालावधी आणखी वाढतो.
हॉटेलनंतर घरात सुद्धा एक आठवडा वेगळे राहावे लागते.
व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यात चीनचे गुप्त औषध म्हणजे कठोर उपाय आणि नियम यासारख्या पद्धती आहेत.
परदेशी मीडियाने याकडे सुद्धा लक्ष दिले पाहिजे.

Web Title :- Corona Wave | does china have a secret medicine to control corona hence the question raised

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Weather Forecast | हवामान विभागाने दिला महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात जोरदार पावसाचा इशारा; 27 जूननंतर पडणार ‘धो-धो’

SBI New Rule | 1 जुलैपासून ATM मधून पैसे काढणे होईल महाग, ‘या’ नियमांमध्ये सुद्धा होणार बदल, जाणून घ्या

PPF Account | कितीवेळा वाढवू शकता PPF अकाऊंटचा कालावधी, जाणून घ्या नियम

SBI ग्राहकांनी लक्ष द्यावे ! 10 दिवसांच्या आत करा ‘ही’ कामे अन्यथा करू शकणार नाही पैशांचे व्यवहार, बंद होऊ शकते खाते