‘कोरोना येताच मास्क घेतले, अपघात होतो म्हणून हेल्मेट का घेत नाहीत’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरस जगभरात पसरला असून याबाबत अनेक गैरसमज पसरवले जात आहेत. कोरोना व्हायरसबाबत जनजागृती करण्यासाठी सरकारकडून योग्य ती उपाय योजना केली जात आहे. नागरिकांच्या मनात कोरोना बाबत असलेला गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामध्ये सोशल मीडियादेखील मागे नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक जोक्स व्हायरल होत आहे. त्यातच रस्ते अपघातासंदर्भात एक मेसेजही व्हायरल झाला होती. आता, कोल्हापूर पोलिसांनीही एक मेसेज करून सकारात्मक संदेश दिला आहे.


कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात दहशत माजवली आहे. भारतात देखील कोरोना व्हायरसची एन्ट्री झाली असून भारतात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 60 वर पोहचली आहे. मागील तीन दिवसांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून सर्वात जास्त केरळमध्ये याचे प्रमाण आहे. तर महाराष्ट्रात देखील कोरोनाचा शिरकाव झाला आहे. आत्तापर्यंत 11 रुग्ण आढळून आले आहेत. परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने मास्क आणि हँण्ड वॉश हे रेशन दुकानात अल्पदरात उपलब्ध करून देण्याची मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

कोरोना व्हायरसमुळे नागरिकांनी मास्क आणि सॅनिटायझर विकत घेण्यासाठी औषध दुकानात एकच गर्दी केल्याचे पहायला मिळत आहे. याचा परिणाम सॅनिटायझरचा तुटवडा जाणवू लागला आहे. याचा फायदा घेत व्यापाऱ्यांकडून 20 रुपयांचे मास्क तब्बल 100 रुपयांना विकले जात असल्याचे सांगण्यात येत आहे. आता कोल्हापूर पोलिसांनी मास्कवरूनच एक मेसेज ट्विट केला आहे. कोल्हापूर पोलिसांचा हा मेसेज
सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायर होत आहे.

कोल्हापूर पोलिसांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, कोरोनाने एक व्यक्ती मयत झाला, तर हजारोंनी मास्क घेतले… अपघातात दररोज 600 लोक मरतात. कोणीच नाही जात हेल्मेट घ्यायला… का ? असे ट्विट कोल्हापूर पोलिसांनी केले होते. या ट्विटला अनेकांनी रिट्विट केले तर अनेकांनी त्यावर सकारात्मक कमेंट करत कोल्हापूर पोलिसांच्या या मेसेजचे कौतुक केले आहे.