Coronavirus : ‘लॉक’ डाऊन म्हणजे काय ? यापूर्वी कधी झालं होतं LockDown, त्यावेळी कसे रहायचे लोक, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेता देशातील अनेक शहरामध्ये लॉक डाऊनची परिस्थिती निर्माण झाली आहे. लॉक डॉऊनमुळे लोकांना आपल्याच घरामध्ये रहावे लागत आहे. ही परिस्थिती फक्त भारतातच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये आहे. सद्याच्या परिस्थितीमध्ये चीन, इटली, स्पेन, लंडन या देशामध्ये लॉक डाऊन आहे. लॉक डाऊन म्हणजे नेमके काय ? याचे कायदेशीर स्वरूप काय आहे आणि यापूर्वी कधी झाले होते लॉक डाऊन याचा थोडक्यात आढावा…

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी अद्याप कोणतेही औषध उपलब्ध नाही. या रोगापासून बचाव करण्याचा एकमेव मार्ग आहे तो म्हणजे संसर्ग झालेल्या व्यक्तीपासून दूर राहणे. देशामध्ये ज्याप्रमाणे कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे ते पाहता लोकांकडून संक्रमण झालेल्या व्यक्तीपासून काही अंतर ठेवले जात आहेत. दिल्ली सरकारने सिनेमागृह, शाळा आणि मॉल बंद करण्याचे आदेश दिले आहेत. आज दिल्लीतील मेट्रो बंद ठेवण्यात आले आहेत.

लॉकडाऊन म्हणजे काय ?
लॉक डाऊन ही आपत्कालीन प्रणाली आहे. जी एखाद्या साथीच्या किंवा आपत्तीच्या वेळी अधिकृतपणे शहरात लागू केली जाते. ज्या ठिकाणी लॉक डाऊन केले आहे त्या ठिकाणच्या लोकांना घरात राहणे बंधन कारक असते. त्यांना घरातून बाहेर पडण्याची परवानगी नसते. लोकांना केवळ औषध, अन्नधान्य अशा आवश्यक गोष्टींसाठी बाहेर येण्याची परवानगी असते. नागरिकांना बँकेचे व्यवहार करण्यासाठी जसे पैसे काढणे यासाठी बाहेर पडण्याची परवानगी असते.

का केलं जात लॉक डाऊन ?
लॉक डाऊन ही आपत्कालीन परिस्थितीमध्ये लागू केली जाते. समाजात किंवा शहरात राहणाऱ्या स्थानिक लोकांना आरोग्यापासून किंवा इतर जोखमीपासून संरक्षित करण्यासाठी लॉक डाऊन केले जाते. कोरोनाचा प्रसार सध्या भारतात वेगाने होत आहे. यात महाराष्ट्र सर्वात आघाडीवर आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांनी लॉक डाऊनचा पर्याय निवडला आहे. मात्र अद्याप लोकांना सक्ती करण्यात आलेली नाही. लोकांनी सरकारच्या निर्णय येण्या आधिपासूनच हा नियम स्वत:वर लागू केला आहे. उदा. इटलीतील लोकांनी स्वत:हून घरात राहणे पसंत केले आहे. जेणे करून कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त पसरू नये.

चीनसह या देशात लॉकडाउन
कोरोनाचा व्हायरसच्या बाधितांची संख्या लक्षात घेता चीन, डेनमार्क, लंडन, अमेरिका, अल साल्वाडोर, फ्रान्स, आयरलँड, इटली, न्यूझीलंड, पोलंड आणि स्पेनमध्ये पहिल्यांदा लॉक डाऊनची परिस्थिती निर्माण झाली. चीनमध्ये पहिल्यांदा कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्याचे समोर आले. त्यामुळे त्या ठिकाणी सगळ्यात आगोदर लॉक डाऊन करण्यात आले. अशाच प्रकारे इटलीमध्ये हजारो लोकांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्याचे उघड झाले त्यावेळी इटलीमध्ये लॉक डाऊन करण्यात आले. इटलीच्या पंतप्रधानांनी संपूर्ण देशात लॉक डाऊनचे आदेश दिले. इटलीनंतर स्पेन आणि फ्रान्स या दोन देशांनी संपूर्ण देशात लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेतला.

यापूर्वी पहिल्यांदा कधी झाले होते लॉक डाऊन
जगभरातील देश कोरोनाचा व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी लॉक डाऊनचा पर्याय निवडत आहेत. यापूर्वी सर्वात प्रथम अमेरिकेत 9/11 दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात लॉक डाऊन करण्यात आले होते. तत्कालीन अमेरिकन सरकारने यावेळी तीन दिवसांचा लॉक डाऊन केले होत. तर 2005 मध्ये न्यू साउथ वेल्स पोलिसांनी दंगे रोखण्यासाठी लॉक डाऊन केले होते.