राम मंदिर बनताच ‘कोरोना’ देशातून पळून जाईल; भाजपच्या महिला खासदाराचा दावा (व्हिडीओ)

पोलिसनामा ऑनलाईन टीम – मध्य प्रदेशचे विधानसभा अध्यक्ष रामेश्वर शर्मा यांच्यानंतर भाजपच्या एका महिला खासदार जसकौर मीना यांनी राम मंदिराचा हवाला देत कोरोना विषयी वक्तव्य केले आहे. राम मंदिर बनताच करोना देशातून हद्दपार होईल, म्हटले आहे.

अयोध्योत राम मंदिराच्या कामाला लवकरच सुरूवात होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराच्या भूमिपूजन होणार आहे. 5 ऑगस्ट रोजी हा कार्यक्रम होणार असून, या कार्यक्रमासाठी मोजक्याच व्यक्तींना निमंत्रण दिले जाणार आहे. पायाभरणीच्या कार्यक्रमाची तयारी जोरात सुरू असतानाच भाजपच्या महिला खासदार जसकौर मीना यांनी कोरोनाबद्दल आश्चर्यकारक विधान केले आहे.

दौसा लोकसभा मतदारसंघाच्या खासदार असलेल्या मीना या विधानामुळे चर्चेत आल्या आहेत. आम्ही आध्यात्मिक शक्तीचे पुजारी असून आध्यात्मिक शक्तीप्रमाणेच चालतो. मंदिर तयार होताच कोरोना देशातून पळून जाईल, असे मीना यांनी म्हटले आहे. त्यांनी (प्रभू रामचंद्रांनी) मानव जातीच्या कल्याणासाठी आणि राक्षसांना मारण्यासाठी त्यावेळी पूनर्जन्म घेतला होता. राम मंदिराचे बांधकाम सुरू होताच देशभरात पसरलेली कोरोनाची महामारी नष्ट होण्यासही सुरूवात होईल. असे म्हटले आहे.