Coronavirus : ‘हर्बल’ चहानं कोरोना होईल नष्ट, ‘या’ देशाच्या राष्ट्रपतींनी केला दावा

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – कोरोना विषाणूने जगभरात कहर केला आहे. लाखो प्रयत्न करूनही वैज्ञानिक, तज्ञ, डॉक्टर यांना यावर इलाज सापडला नाही. हा विषाणू दूर करण्यासाठी दररोज नवीन दावे केले जात आहे. आता या क्रमवारीत, मादागास्करच्या अध्यक्षांनी हर्बल चहा सुरू केला असून त्यांनी दावा केला आहे की, या हर्बल चहाने कोरोना विषाणू पूर्णपणे नष्ट होईल.

मादागास्करचे अध्यक्ष आंद्रे राजोएलिन यांनी कोरोना विषाणूच्या उपचारांसाठी हर्बल चहा अधिकृतपणे सुरू केला आहे. ‘एप्लाइड रिसर्च’ या संस्थेच्या एका कार्यक्रमात राष्ट्रपती म्हणाले की, याची चाचणी घेण्यात आली असून दोन लोकांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.

ते म्हणाले की, मी हे उत्पादन प्रत्येकासमोर पिऊन दाखवेल, ज्यामुळे सिद्ध होईल की यामुळे उपचार होऊ शकतो. या हर्बल चहाचे नाव कोविड ऑर्गेनिक्स राष्ट्रपतींनी ठेवले आहे आणि ते आर्टेमेसिया नावाच्या वनस्पतीमध्ये तयार केले गेले आहे. हि वनस्पती मलेरियावर उपचार करण्यासाठी खूप प्रभावी ठरली आहे.

स्थानिक औषधी वनस्पतींचा वापर हा हर्बल चहा करण्यासाठी केला जात आहे आणि असे म्हटले आहे की, हे कोविड ऑर्गेनिक्स प्रोफेलेक्सिसच्या रूपात असेल जे कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. मादागास्करमध्ये कोरोना विषाणूच्या 121 घटनांची पुष्टी झाली आहे, परंतु अद्यापपर्यंत तेथे कोणीही मरण पावले नाही.