काय सांगता ! होय, आता घरबसल्या फक्त एका गोळीनं होणार तुम्ही कोरोना पासून मुक्त

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाने जगात थैमान घातले असून यावरून लोकांची परिस्थती बिकट झाली आहे. मात्र आता कोरोनापासून बचाव करण्यासाठी फायजर कंपनीने कोरोना संसर्ग असणाऱ्या लोकांसाठी औषध तयार केले आहे. तर त्या कंपनीने फक्त एका गोळीमध्ये उपचार होणार असल्याचा दावा केला आहे. परंतु त्या उपचाराचा फायदा भविष्यात होणार आहे. त्या गोळीचे नाव PF-07321332 असे आहे. सध्या तयार केलेल्या या औषधाची क्लिनिकल चाचणी सुरूय, चाचणी नंतर यश आल्यावर रुग्णालयात न जाता लोक घरीच या उपचाराद्वारे ठीक होणार आहे.

सध्या या गोळ्याची फेज एक चाचणी अमेरिका आणि बेल्जिअमम या देशात सुरु आहे. या चाचणीमध्ये १८ ते ६० वयोगटातील ६० लोकांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच, आतापर्यंत या औषधाची चाचणी प्राण्यांवर झाली आहे. यामधून, कोणत्याही प्रकारची जोखीम समोर आली नसल्याचा कंपनीने दावा केला आहे. असे टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार माहिती समोर आलीय.

अशा पद्धतीने करेल काम –
हे औषध HIV च्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या अॅन्टी रेट्रोव्हायरल औषधाप्रमाणे आहे. याप्रकारचं औषध शरीरात विषाणूचे प्रमाण इतकं कमी करते की, त्याला ओळखंलही जाणार नाही. याने विषाणू वाढू शकत नाही आणि इतर लक्षणांवर उपचार घेऊन रूग्ण ठीक होतो. हे औषध प्रोटीज इनहिबिटर टेक्निकने बनवले आहे. ज्यामध्ये औषध प्रसारित शरीरावर प्रभाव करतं आणि विषाणू कोशिकांमध्ये आपली कॉपी तयार करू शकत नाही. HIV याशिवाय हेपेटायटिस सी संसर्ग विरोधातही अशाप्रकारच्या टेक्नीकने औषध तयार केलं गेलं आहे.

अल्प व्यक्तीवर चाचणी का?
या औषधाने SARS-कोव -2 व्यतिरिक्त अन्य कोरोना संसर्गावरही प्रभाव दिसून येत आहे. यामध्ये भविष्यात जरी कोरोना संसर्ग याचे नवं रूप आलं तर त्यावरही हे औषध प्रभावी ठरणार आहे. असे फायजर कंपनीने म्हटले आहे. तसेच, पुढे म्हणाले, पहिल्या टप्प्यात थोडक्यात निरोगी लोकांवर या औषधाची चाचणी केली जात आहे. कारण यामुळे, मानवी शरीर हे औषध किती सहन करू शकतं. जर सर्व काही ठीक झालं तर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये अधिक लोकांवर चाचणी करणार आहे. आता औषधावर संशोधन सुरू आहे. यामध्ये हे औषध बाजारात कधी येईल हे सांगता येणार नाही.

इंजेक्शनच्या डोसची चाचणी –
गोळ्या व्यतिरिक्त आता फायजर कंपनी इंजेक्शनची सुद्धा चाचणी करणार आहे. यामध्ये, पीएफ – 07304814 असे त्याचे नाव आहे. याची सध्या Phase 1-B multi-dose चाचणी सुरू आहे. हे आता रुग्णालयात दाखल कोरोना संसर्ग रुग्णांना दिला जातो. औषध तोंडावाटे घेतल्या जाणाऱ्या गोळीच्या रूपात तयार केलं जात. कारण संसर्ग लोकांना प्रथम लक्षणे दिसताच व्यक्तीला देता यावी. यामध्ये रूग्णाला रुग्णालयात घेऊन जाणे किंवा ICU मध्ये दाखल करण्याची आवश्यकता भासणार नाही. असे फायजर कंपनीचे चीफ वैज्ञानिक अधिकारी मायकल डॉलस्टन यांनी सांगितले आहे.