Coronavirus : मुंबईतील धारावीत आढळला ‘कोरोना’चा रुग्ण, धोक्याची घंटा ?

मुंबई :  पोलीसमाना ऑनलाइन –  राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना बुधवारी (दि.1) सायंकाळी धारावी येथे कोरोना विषाणूची लागण झालेल्या संशयित रुग्णाची माहिती मिळाली. हा रुग्णाला ताब्यात घेण्यासाठी प्रशासन व आरोग्य विभागाने पथक धारावी झोपडपट्टीत पाठवले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आता प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याठिकाणी स्वच्छता करण्यास सुरुवात केली आहे.

धारावीच्या परिसरात हजारो झोपडपट्ट्या आहेत. या ठिकाणी हा रुग्ण आढळून आला आहे. अशा परिस्थितीत या भागात संसर्ग पसरण्याचा धोका वाढण्याची शक्यता असल्याचे लक्षात घेता अधिकाऱ्यांनमध्ये भीतीचे वातावरण आहे. हजारो झोपड्या असलेल्या धारावीत कोरोनाच रुग्ण आढळून आल्याने धोका वाढण्याची शक्यता आहे. या ठिकाणी हजारो झोपड्या एकमेकांना चिटकून असल्याने या ठिकाणी कोरोना वेगाने पसरण्याची मोठी शक्यता आहे.

कुटुंबातील व्यक्ती क्वारंटाईनमध्ये

मुंबई पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या मते, शाहू नगरमध्ये एका 65 वर्षीय व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षण आढळू आली. कोरोनाची लक्षण आढळून आल्यानंतर त्या व्यक्तीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याशिवाय त्याच्या कुटुंबातील इतर सात जणांना देखील क्वारंटाईन कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांची गुरुवारी तपासणी करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच हा व्यक्ती ज्या इमारतीत रहात होता ती इमारत सील करण्यात आली असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like