Be Alert ! भारतात होणार्‍या मृत्यूंचे एक मोठे कारण आहे CAD, तुम्हीसुद्धा याने ग्रस्त नाही ना ?

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनरी आर्टरी डिसीज (सीएडी) भारतात मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक बनले आहे. कोरोनरी आर्टरी डिसीज एक असा आजार आहे, ज्यामध्ये हृदयापर्यंत रक्त योग्य प्रकारे पोहाेचू शकत नाही. हृदयाला रक्त पोहाेचवणार्‍या धमणीमध्ये ब्लॉकेज किंवा एखाद्या अन्य कारणामुळे अडथळा निर्माण होतो. मात्र, याचा उपचार शक्य आहे, परंतु जर उपचार योग्य वेळी करण्यात आला नाही, तर हा कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूचे कारण बनू शकतो, असे डॉ. टी. एस. क्लेर यांनी म्हटले आहे.

भारतात प्रतिएक लाख लोकसंख्येत सुमारे 272 लोक या आजाराने पीडित आहेत आणि हा प्रतिएक लाखावर 235 च्या जागतिक सरासरीपेक्षा जास्त आहे. सीएडीमध्ये आर्टरीज आकुंचन पावते किंवा अडथळा येतो, ज्यामुळे शारीरिक हालचालींचा अभाव आणि जेवणाच्या सवयींमध्ये बदल होऊ शकतो. कोरोनरी आर्टरीच्या गुंतागुंतीच्या रुग्णांमध्ये डायबिटीज किंवा लठ्ठपणासारख्या जीवनशैलीशी संबंधित रोगांची वेगवेगळी लक्षणे दिसतात. मात्र, गंभीर प्रकरणात ज्यामध्ये रुग्ण कोरोनरी हार्ट डिसीजच्या उच्च जोखमीची तकार करतो, डॉक्टर पर्याय म्हणून कार्डियक स्टेंट्सचा सल्ला देतात. उदाहरणार्थ प्लाक उघडल्याने हार्ट अटॅक होतो, ज्यामुळे अंशतः बंद असलेल्या आर्टरीमध्ये रक्ताची गुठळी बनते, जी रक्ताच्या प्रवाहाला अडथळा निर्माण करते.

चांगल्या गुणवत्तेचा स्टेंट जीव वाचवू शकते
जसजसे व्यक्तीचे वय वाढते, तसतशा धमण्या कठीण होतात आणि प्लाक जमणे शक्य होते. परंतु काही अशी कारक आहेत ज्यांच्यामध्ये व्यवहार, अवस्था किंवा सवयींचा समावेश आहे, यांच्यामुळे सीएडी विकसित होण्याची प्रक्रिया वेगाने होऊ शकते. अशा अवस्थेत चांगल्या गुणवत्तेचा स्टेंट जीव वाचवू शकतो. यासाठी भारतात रुग्ण आणि उच्च गुणवत्तेच्या स्टेंट्समधील अंतर दूर करणे खूप महत्त्वाचे आहे, जेणेकरून रुग्णाची सुरक्षेशी कोणतीही तडजोड होऊ नये.

परदेशी स्टेंट्ससारख्या उच्च दर्जाच्या आणि स्वस्त स्टेंट्सची गरज
स्थानिक स्टेंट्स उत्पादकांनी जगात तयार होणार्‍या स्टेंट्सना मापदंड म्हणून उपयोगात आणले पाहिजे. ज्यामुळे गुणवत्तापूर्ण यंत्र बनवता येईल आणि यातून योग्य प्रकारे भारताला आत्मनिर्भर बनवण्यात योगदान देता येईल.