बाळाला जन्म देताच ‘कोरोना’बाधित महिलेचं निधन, डॉक्टरांच्या धडपडीमुळे बाळ बचावले

कोल्हापूर  : पोलीसनामा ऑनलाइन –  कोल्हापूर जिल्ह्यात एका कोरोनाबाधित गर्भवती महिलेचे प्रसुतीनंतर निधन झाले. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. डॉक्टरांच्या धडपडीमुळे आणि सहकार्यामुळे बाळ बचावले आहे. आता बाळ सुखरूप आहे, असे सांगितले जात आहे.

यावेळी जन्मलेल्या बाळाला श्वास घेता येत नव्हता,तसेच त्याचे ठोके देखील जाणवत नव्हते. यातच या बाळालाही कोरोनाची लागण झाली असेल म्हणून डॉक्टरांनी बाळाला वाचविण्यासाठी धडपड केली. यात त्यांना यश आले मात्र, त्याच्या आईला नाही वाचवू शकले.

जन्मानंतर आईच्या स्पर्शासाठी आसूसलेल्या ‘त्या’ बाळासमोर पीपीई किट घातलेले डॉक्टर आणि नर्स दिसत होते. यावेळी ते डॉक्टर्स आणि नर्स हेच त्या बाळासाठी देवदूत ठरले.

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील एका गावात संपूर्ण कुटुंब कोरोनाबाधित झाल्याचे समजले. यात गर्भवती महिलेला देखील कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाची लागण झाल्यानतंर त्या महिलेने बाळाला सुखरुप जन्म दिला पण, ती यात बचावली नाही. आई गेल्यानंतर बाळाला पाहण्यासाठी कोणी येऊ शकत नव्हते. संपूर्ण कुटुंब क्वारंटाईन होते. त्यामुळे डॉक्टर आणि नर्स यांच्या सावलीखाली बाळ होतं.

जन्मानंतर पहिला तास बाळासाठी खूप अवघड होता. पण, डॉक्टर प्रयत्न करीत होते. दोन दिवसांनी बाळ व्हेंटिलेटरवर होतं. दोन दिवसात कोणी फिरकले नाही. अशावेळी डॉक्टरांनी बाळावर होणारा उपचाराचा खर्च उचलला.

चौथ्या दिवशी सैन्यात असलेल्या बाळाच्या काकांनी चौकशी केली असता त्यांना बाळाला आयसीयूमध्ये ठेवल्याचे कळले. बाळाला वाचवा..अशी विनंती त्यांनी डॉक्टरांकडे केली.

कोरोना चाचणीनंतर बाळाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला तरीही ते अत्यवस्थ होतं. मात्र, हळूहळू बाळ उपचाराला प्रतिसाद देऊ लागलं. आज बाळ पूर्ण फिंडिंग घेत आहे, असे तेथील डॉक्टर सांगत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like