Coronavirus Impact : मोदी सरकारकडून 1.70 लाख हजार कोटीच्या पॅकेजची घोषणा, जाणून घ्या कोणाला काय मिळणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कालपासून अर्थमंत्री पॅकेज देण्याबाबत चर्चा चालू होती. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रकरणांना पाहता अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून काही मोठ्या घोषण केल्या जाऊ शकतात. अलीकडेच दोन दिवसांपूर्वी इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याबाबत आणि पॅनकार्डला आधारशी लिंक करण्याबाबत मुदत वाढवली होती. पीएम मोदींनीही १९ मार्चला देशाला संबोधित करताना म्हटले होते की, अर्थ मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक टास्क फोर्स बनवली गेली होती जी वेळेवर आर्थिक स्थितीतील अडचणी आणि उपाययोजनांबद्दल माहिती देईल.

सरकारने पीएम गरीब कल्याण योजनेअंतर्गत गरीब आणि निराधार लोकांना मदत केली जाणार आहे. तर आरोग्य कमर्चारी जीवाशी खेळत लोकांचा जीव वाचवत असून आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी ५० लाख रु. विम्याची व्यवस्था केली गेली आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या पत्रकार परिषदेतील विशेष गोष्टी –

तीन महिने ५ किलो गहू किंवा तांदूळ अतिरिक्त देयकाशिवाय दिला जाईल. ८० कोटी लोकांसाठी अन्न योजना. कोणताही गरीब विना अन्नाचा राहणार नाही. प्रत्येक गरीब कुटुंबाला पुढचे तीन महिने १ किलो डाळ मोफत मिळणार. प्रदेशाच्या हिशोबाने डाळी असतील. हे सगळे पीएम गरीब कल्याण योजनेचा भाग आहे.

आरोग्य कर्मचाऱ्यांना विमा देण्याच्या घोषणेत २० लाख लोकांना फायदा होणार.
पीएम अन्न योजनेसह अन्नदात्यासाठी विशेष योजना असून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात २ हजारच्या टप्प्यात डाळ दिली जाणार. देशात ८ कोटी ७० लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार. मनरेगा अंतर्गत मिळणारे वेतन वाढवण्याचा निर्णय केला गेला असून आता मनरेगामध्ये काम करणाऱ्यांना १८२ रु. ऐवजी २०२ रुपये मिळणार.

वृद्ध, विधवा आणि अपंगांना पुढचे तीन महिने १००० रु. दोन टप्प्यात दिले जाणार. ही रक्कम सरळ लाभार्थ्यांच्या खात्यात जाणार. तीन कोटी लोकांना लाभ मिळणार. महिला जनधन योजनेअंतर्गत खाते धारकांना तीन महिने त्यांच्या खात्यात ५०० रुपये दिले जाणार. यामुळे तब्बल २० कोटी लाभार्थ्यांना मदत मिळणार. हे पैसे डीबीटी द्वारे पाठवले जातील. पीएम उज्जवला योजने अंतर्गत ८ कोटी लाभार्थ्यांना पुढचे तीन महिने मोफत गॅस मिळणार.