Corona Re-entry ने चीन हादरला, 2 मोठ्या प्रांतात Lockdown, 8 महिन्यांनी पहिला मृत्यू, WHO ची टीम दाखल

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोना व्हायरसच्या उद्रेकाच केंद्र असलेल्या चीनमध्ये कोरोनाने पुन्हा एन्ट्री केल्याने मोठा हादरा बसला आहे. चीनच्या हुबेई प्रांतात 8 महिन्यानंतर पुन्हा एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. वाढत्या रुग्णांमुळे दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत आहे. त्यामुळे काही मोठ्या प्रांतामध्ये लॉकडाऊन केले आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांची टीम चीनमध्ये काही वेळातच पोहोचणार असून चीनच्या वुहान विमानतळावर त्यांना नेण्यासाठी वाहने दाखल झाली आहेत. या टीममध्ये जागतिक ख्यातीचे 10 तज्ज्ञ असणार आहेत. कोरोना महामारीच्या उत्पत्तीचे कारण जाणून घेण्यासाठी पथक चीनच्या वुहान शहराला भेट देणार आहे.

चीनमध्ये सध्या कोरोना बाधित रुग्णांमध्ये पुन्हा वेगाने वाढ होत आहे. चीनमध्ये कोरोनाचा शेवटचा बळी मे 2020 मध्ये गेला होता. त्यानंतर हाताच्या बोटावर मोजण्याएवढे रुग्ण सापडत होते. परंतू कोणाचा मृत्यू झाला नव्हता. मात्र, चीनच्या हैबेई प्रांतात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. यामुळे 20 दशलक्ष लोकसंख्येच्या या भागात आणीबाणीची घोषणा केली असून लॉकडाऊन करण्यात आला आहे. या प्रांतात 8 महिन्यांनी कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रीय़ आरोग्य विभागाने सांगितले की येथे 138 नवीन रुग्ण सापडले आहेत. हा आकडा गेल्या वर्षीच्या मार्चनंतरचा सर्वात मोठा आकडा आहे. कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे चीन सरकारने हैबेई प्रांतातील राजधानी शीज़ीयाज़ूआंगमध्ये परिवहन बस, ट्रेन, शाळा, दुकाने बंद केली आहेत. त्याच्या शेजारील प्रांत जिंगताईमध्येही कडक लॉकडाऊन केला आहे. या प्रांतातील लैंगलांग शहरात पाच दशलक्ष लोक राहतात. जे गेल्या शुक्रवारपासून घरात बंद आहेत.

चीनची लस ठरली फेल, आता भारतीय लसीकडे वळले
कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी चीनने तयार केलेल्या सायनो व्हॅक लशीच्या नुकत्याच आलेल्या परीक्षणाच्या निकालाने संपूर्ण ब्राझीलला भयभीत केले आहे. चीनने मोठ्या आशेने ही लस पाठवली होती. मात्र, ती कोरोनाविरोधात केवळ 50 टक्केच यशस्वी ठरली. चिनी लशीच्या तिसऱ्या टप्प्यावरील परीक्षणाच्या या निकालानंतर ब्राझील सरकारने भारतीय लशीकडे आपले लक्ष वळवले आहे. याचाच एक भाग म्हणून ब्राझीलने मंगळवारी कोव्हॅक्सीन तयार करणाऱ्या भारत बायोटेक कम्पनीसोबत करार केला आहे. याशिवाय ऑक्सफर्ड-एस्ट्रजेनकाच्या लशीसाठीही पुण्यातील सीरम इंस्टिट्यूटसोबत करार केला आहे.